घरमहाराष्ट्र...तर बुद्धिबळ खेळणं गरजेचं, 'आम्ही राजकारणातील ग्रँडमास्टर; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

…तर बुद्धिबळ खेळणं गरजेचं, ‘आम्ही राजकारणातील ग्रँडमास्टर; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

Subscribe

मला वर्षभरापासून चेकमेट करण्याचा विरोधकांचा प्रयत्न सुरू आहे. परंतु आम्ही राजकारणातील बुद्धिबळाचे ग्रँडमास्टर आहोत, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी ठाकरे गटासह विरोधकांवर निशाणा साधला. 

पद्मविभूषण बुद्धिबळपटू विश्वानाथन आनंद हे आज ठाण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचं स्वागत केलं. त्यानिमित्तानं मुख्यमंत्र्यांनी बुद्धिबळाच्या भाषेत विरोधकांवर टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, विश्वनाथन यांनी एकाच वेळी 22 स्पर्धकांशी मुकाबला केला आहे, खरं तर त्यांनी राजकारणात यायला हवं होतं. कारण इकडेही आम्हाला एकाच वेळी अनेकांना तोंड द्यावं लागतं. विरोधकांना चितपट करावं लागतं. मला वर्षभरापासून चेकमेट करण्याचा विरोधकांचा प्रयत्न सुरू आहे. परंतु आम्ही राजकारणातील बुद्धिबळाचे ग्रँडमास्टर आहोत, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी ठाकरे गटासह विरोधकांवर निशाणा साधला. (CM Eknath Shinde Criticized Thackeray group and Opposition while talking on Vishwanathan Anand chess)

मुख्यमंत्री म्हणाले की, राजकारणात काही तिरक्या चालीचे उंट असतात, काही अडीच घर चालणारे घोडे असतात, काही हत्ती असतात, सगळेच एकमेकांना चेकमेट करण्यासाठी तयारी करत असतात. गेल्या एक वर्षापासून मलाही चेकमेट करायचा प्रयत्न अनेकजण करत आहेत, पण त्यांचं स्वप्न काही साकार होत नाही. विरोधकांनी आपली बुद्धी कितीही पणाला लावली तरी जनतेच्या विश्वासाचं आणि पाठिंब्याचं बळ माझ्याकडे आहे. त्यामुळे विरोधकच सतत चितपट होत आहेत. तसंच, आजकाल राजकीय विरोधकांशी लढा द्यायचा तर आमच्यासारख्या नेत्यांना खरं तर बुद्धिबळ खेळण्याची फार गरज आहे. मात्र, मला कल्पना आहे एकवेळ राजकारणातील बुद्धिबळ खेळणं सोप आहे. परंतु जगात स्वत:ची मुद्रा उमटवणं फार कठीण आहे. विश्वनाथन आनंद यांनी हे फक्त एकदाच नव्हे तर अनेकदा साध्य केलं आहे. विश्वनाथन हे पाच वेळा जागतिक विजेते ठरले आहेत,असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विश्वनाथन यांचं कौतुक केलं तर विरोधकांना जोरदार टोलेही लगावले.

- Advertisement -

मुख्यमंत्री म्हणाले की , मागच्या वर्षी आम्ही जी क्रांती केली ती पाहून लोक आम्हाला राजकारणातील ग्रँडमास्टर म्हणतात. परंतु, खरे ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद हेच आहेत. तसंच, मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आमच्या ठाण्यातही एक ग्रँडमास्टर आनंद होते. समाजकारणातील ग्रँडमास्टर, त्यांचं नाव आनंद दिघे आहे, असं शिंदे म्हणाले. बुद्धिबळाचा उगम हाच मुळी भारतात झाला. महाराष्ट्रालाही बुद्धिबळ खेळाची मोठी परंपरा आहे. महाराष्ट्रातून आतापर्यंत 7 ग्रँडमास्टर झाले आहेत. त्यात प्रवीण ठिपसे, अभिजीत कुंटे, तेजल बकरे, वैभवी, तसंच, खाडीलकर भगिनींची कामगिरीही मोठी आहे. क्रिकेटसारख्या खेळांकडे बहुसंख्य मुलांचा ओढा असताना विश्वनाथन आनंद यांच्यासारख्या महान खेळाडूंनी बुद्धिबळाला ग्लॅमर प्राप्त करून दिलं आहे, असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी बुद्धिबळाविषयी, विश्वनाथन आनंद यांच्याविषयी कौतुकोद्गार काढले. तसंच, विरोधकांवर चौफेर फटकेबाजीही केली.

( हेही वाचा: Sanjay Raut : देश ‘त्या’ शुभ घटनेची वाट पाहतोय, संजय राऊतांचा आशावाद )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -