घरताज्या घडामोडीवडिलांनी साथ सोडली असेल पण.., अमोल कीर्तिकरांचं मोठं वक्तव्य

वडिलांनी साथ सोडली असेल पण.., अमोल कीर्तिकरांचं मोठं वक्तव्य

Subscribe

बाळासाहेब ठाकरेंचे निकटवर्तीय आणि पहिल्या फळीतले शिवसैनिक आणि खासदार गजानन कीर्तिकर यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेते काम करण्याचा प्रण केला. परंतु गजानन कीर्तिकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतरही त्यांचे सुपुत्र अमोल कीर्तिकर हे अद्यापही ठाकरे गटात आहेत. दरम्यान, माझ्या वडिलांनी शिवसेना सोडली असली तरी मी शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेनेसोबतच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात पक्ष वाढवण्यासाठी काम करत राहणार, असं अमोल कीर्तिकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

कीर्तिकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर अमोल कीर्तिकर यांची पुढील भूमिका काय असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. परंतु त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की, मी वडिलांना समजावण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु त्यांनी हा त्यांचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मी कालही उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात काम केले आणि पुढेही करत राहणार, असं अमोल कीर्तिकर म्हणाले.

- Advertisement -

आपण पक्ष चालवतो तेव्हा लोकांची मतं बदलत असतात. वडिलांना समजावणं हे माझे काम आहे. एखाद्या कार्यकर्त्याने जरी असा विचार केला तरी त्याला समजावणं हे माझं काम आहे. माझी आणि वडिलांची राजकीय भूमिका वेगवेगळी असली तरी राजकारणातील कटुता कौटुंबिक जीवनात येऊ नये यासाठी मी प्रयत्न करेन, असे अमोल कीर्तिकर म्हणाले.


हेही वाचा : महाराष्ट्रातील प्रदूषणात वाढ, मुंबईत दिल्लीपेक्षाही हवेचा खराब

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -