घरताज्या घडामोडीAmit Shah : शेपूट घालणं म्हणजे मर्दुमकी नाही; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना...

Amit Shah : शेपूट घालणं म्हणजे मर्दुमकी नाही; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

Subscribe

देशभक्तीचा परिचय त्यांनी दिला, त्यांना शेपूट घालणं म्हणजे मर्दुमकी नाही. त्यांचा निषेध केला पाहिजे, असं म्हणत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टोला लगावला. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची महत्त्वाची बैठक पार पडली.

मुंबई : देशभक्तीचा परिचय त्यांनी दिला, त्यांना शेपूट घालणं म्हणजे मर्दुमकी नाही. त्यांचा निषेध केला पाहिजे, असं म्हणत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टोला लगावला. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी माध्यमांशी संवाद साधला. (Cm Eknath Shinde Reply To Shiv sena thackeray group leader uddhav thackeray)

धाराशिव आणि लातूरच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली होती. त्यावेळी अमित शाह हे शेपूट घालणारे गृहमंत्री आहेत, अशी जोरदार टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ठाकरेंच्या याच टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “देशाचे कणखर आणि धाडसी गृहमंत्री अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 370 कलम हटवलं. जे स्वप्न होत ते त्यांनी पूर्ण करून दाखवलं. तसेच, देशभक्तीचा परिचय त्यांनी दिला, त्यांना शेपूट घालणं म्हणजे मर्दुमकी नाही. त्यांचा निषेध केला पाहिजे”, अशा शब्दांत मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

- Advertisement -

याशिवाय, “या फोटोग्राफरना शेपूट असलेल्या प्राण्यांचे फोटो काढायला आवढत होते. त्यामुळे त्यांचे शेपटीबाबत जास्तीचे प्रेम वाढलंय. वेळेप्रसंगी शेपूट घालणारे, दिल्ली जाणारे, दिल्लीला लोटांगण घालणारे आणि नोटीस आली की घाम फुटणारे हे कोण आहे? तसेच, खुर्चीसाठी सत्तेसाठी मुख्यमंत्री पदासाठी सगळं सोडलं. बाळासाहेबांचे विचार सोडले, शेपूट कोणी घातलं? हे सगळ्यांना माहीत आहे. ज्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला त्यांना यांनी शिवाजी पार्कवर आणलं. तसेच, याकूब मेननची कबर सजवणं हे कोणते देशप्रेम आहे?”, असाही हल्लाबोल एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंवर केला.

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

“अमित शाह महाराष्ट्रात आले होते. मणिपूर पेटलं तिथं जायची त्यांची हिंमत झाली नाही. तिथे शेपूट घातलं आणि महाराष्ट्रात येत आहेत. फणा काढत आहेत. हा नागोबा. काश्मीरमध्ये जायची त्यांची हिंमत नाही. अरुणाचलमध्ये चीन घुसलंय तिथे जात नाही. तिथेही शेपूट घातलंय. असा हा शेपूट घाल्या गृहमंत्री महाराष्ट्रात आला आणि आमच्यावर फणा काढून गेला. माझ्यावर काय बोलले त्याचा मी नंतरच्या सभेत समाचार घेईल. पण त्यांची या राज्यांमध्ये जायची हिंमत होत नाही”, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांच्यावर निशाणा साधला होता.

- Advertisement -

हेही वाचा – EKNATH SHINDE : पंतप्रधानांना औरंगजेब म्हणणं हा देशद्रोह; मुख्यमंत्री शिंदेंची संजय राऊतांवर टीका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -