घरमहाराष्ट्रDasara Melava: शिंदे बरसणार; आझाद मैदानावरून या मुद्यांवर बोलणार?

Dasara Melava: शिंदे बरसणार; आझाद मैदानावरून या मुद्यांवर बोलणार?

Subscribe

एकनाथ शिंदे यांचा पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतरचा हा पहिलचा दसरा मेळावा आहे. त्यामुळे ते यावेळी ठाकरे गटावर काय टीका करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानावर होणार आहे. त्यासाठी तब्बल सव्वा लाख कार्यकर्त्यांसाठी खुर्च्यांची सोय करण्यात आली आहे. गेल्या वर्षी दसऱ्या मेळाव्यातून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले होते. यंदाच्या मेळाव्यात ते काय बोलतात याकडे राज्याचं लक्ष आहे.

एकनाथ शिंदे यांचा पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतरचा हा पहिलचा दसरा मेळावा आहे. त्यामुळे ते यावेळी ठाकरे गटावर काय टीका करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Cm Eknath Shinde what will talk in Darasa Melava eknath Shinde Azad Maidan Shivsena Thackeray group Shinde group Modi Anand Dighe )

- Advertisement -

2022 मध्ये शिवसेनेत दोन गट पडले आणि शिंदे गटाने वेगळा सवतासुभा मांडला. एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगामध्ये पक्ष आणि चिन्हाचा वाद जिंकला आणि शिवसेना हा पक्ष शिंदे गटाचं असल्यावर शिक्कामोर्तब झालं. त्यामुळे यंदा नेमकं शिंदे काय बोलणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणारे.

उद्धव ठाकरे यांनी नुकतंच समाजवादी परिवाराशी आघाडी घेतली आहे. तसंच त्यांच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबतच्या युतीवरून आज एकनाथ शिंदे त्यांचा समाचार घेण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्व कसं बोगस आहे आणि आपणच कसे बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांचे पाईक आहोत हे ठासवण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे करतील.

- Advertisement -

केंद्रातील सरकरा तसंच पंतप्रधान मोदींचं कौतुक

नरेंद्र मोदी हे केवळ भारतात नव्हे तर जगभरात त्यांच्या कार्याने ओळखले जात असून त्याचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. मोदींनी गेल्या 9 वर्षांमध्ये केलेली कामं, लोकोपयोगी योजना आणि जागतिक स्तरावर त्यांनी घेतलेली कणखर भूमिका याची उजळणी आज एकनाथ शिंदे पुन्हा एकदा करणार.

मराठा आरक्षणावर भूमिका मांडण्याची शक्यता

राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा विषय तापत आहे. मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला मराठा आरक्षणासाठी दिलेली मुदत संपणार आहे. त्यामुळे आजच्या मेळाव्याच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मराठा आरक्षणावर आपली भूमिका मांडण्याची शक्यता आहे. तसंच राज्यातील विकासकामांबाबतही ते शिवसैनिकांना सांगतील.

(हेही वाचा: शिवसेनेचा दसरा मेळावा, ज्वलंत हिंदुत्वाचा हुंकार; शिंदे गटाकडून तयारी पूर्ण)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -