Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र Breaking : मनोज जरांगेंचे उपोषण सुटणार कधी? जालन्याला जाण्याबाबत मुख्यमंत्री शिंदेंची अनिश्चितता

Breaking : मनोज जरांगेंचे उपोषण सुटणार कधी? जालन्याला जाण्याबाबत मुख्यमंत्री शिंदेंची अनिश्चितता

Subscribe

मुख्यमंत्र्यांना पत्रकारांकडून ते जालन्याला जरांगे यांच्या भेटीकरिता जाणार की नाही, याबाबतचा प्रश्न विचारला. पत्रकारांच्या या प्रश्नाला उत्तर देताना ते अद्यापही जरांगे यांची भेट घेणार की नाही, हे अनिश्चित असल्याचे त्यांच्या उत्तरातून स्पष्ट झाले आहे.

मुंबई : गेल्या 16 दिवसांपासून मनोज जरांगे पाटील जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावामध्ये उपोषणाला बसलेले आहेत. मराठा समाजाला आरक्षण देत त्यांना सरसकट कुणबी जातप्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे. परंतु राज्य सरकारकडून मनोज जरांगे यांच्याकडे एक महिन्याचा कालावधी मागितला आहे. तर जरांगे यांनी सुद्धा सरकारला एक महिन्याची मुदत देत त्यांचे उपोषण सोडविण्याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यमंत्रिमंडळातील लोकांनी उपस्थित राहावे, अशी अट घातली. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जालन्याला जाऊन जरांगे यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत होते. परंतु याबाबत आज (ता. 13 सप्टेंबर) मुंख्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. (CM Eknath Shinde’s uncertainty about going to Jalana to meet Manoj Jarange)

हेही वाचा – कोणाच्याही अपप्रचाराला बळी पडू नये, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे मराठा समाजाला आवाहन

- Advertisement -

सोमवारी (ता. 11 सप्टेंबर) रात्री सर्वपक्षीय बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते. त्यावेळचा मुख्यमंत्र्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत आहे. या व्हिडीओबाबतचे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिले आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांना पत्रकारांकडून ते जालन्याला जरांगे यांच्या भेटीकरिता जाणार की नाही, याबाबतचा प्रश्न विचारला. पत्रकारांच्या या प्रश्नाला उत्तर देताना ते अद्यापही जरांगे यांची भेट घेणार की नाही, हे अनिश्चित असल्याचे त्यांच्या उत्तरातून स्पष्ट झाले आहे.

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर चर्चा सुरू आहे. आमचे शिष्टमंडळ काल तिथेच होते. तसेच आजही तिथे जाणार आहे. त्यांच्याशी सर्व सविस्तर चर्चा झाल्यानंतर जालन्यात जाण्याबाबत निर्णय घेईन. आमचे मंत्री कालही तिकडे होते. ते आजही जरांगे यांच्या भेटीला जातील. जरांगे यांच्यासोबत चर्चा सुरू आहे. त्यांची काल माझ्यासोबतही चर्चा झाली होती. मनोज जरांगे यांनी सकारात्मक चर्चा केली. त्यांनी तांत्रिक बाबी समजून घेतल्या आहेत. आमचे लोक आज पुन्हा त्यांच्यासोबत बोलतील. त्यानंतर पुढचा निर्णय घेतला जाईल, असे शिंदे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

- Advertisement -

तसेच, हा मराठा समाजाचा आणि संपूर्ण राज्याचा समाजिक प्रश्न आहे. त्यामुळे याचे कोणीही राजकारण करु नये. कारण हा मराठा तरुणांच्या जीवाचा प्रश्न आहे. मनोज जरांगे यांच्या जीवाची पर्वा सरकार आणि सर्वांना आहे. त्यामुळे सरकारने सर्वपक्षीय बैठक देखील घेतली. आतापर्यंतच्या इतिहासात असे पहिल्यांदा घडले. या बैठकीतले मुद्दे विरोधाभासाचे असता कामा नये. कारण या बैठकीत सर्वांनी सकारात्मक भूमिका घेतील. त्यामुळे समाजात तेढ निर्माण होईल, अशी भूमिका कुणीही घेऊ नये, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आले आहे.

- Advertisment -