घरमहाराष्ट्रकोणाच्याही अपप्रचाराला बळी पडू नये, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे मराठा समाजाला आवाहन

कोणाच्याही अपप्रचाराला बळी पडू नये, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे मराठा समाजाला आवाहन

Subscribe

मुख्यमंत्री शिंदे यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांनी या प्रकरणी ट्वीट करत स्पष्टीकरण दिले. त्याशिवाय त्यांनी याबाबत पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे. कोणीही अशा प्रकारचा खोडसाळपणा करू नये, तसेच कोणाच्याही अपप्रचाराला मराठा समाजाने बळी पडू नये, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आले आहे.

मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत. त्यापार्श्वभूमीवर राज्य सरकारने सर्वपक्षीयांची बैठक बोलावली होती. त्या बैठकीची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यावरून आता शिंदे-फडणवीस सरकार विरोधकांच्या निशाण्यावर आले आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात येत आहे. परंतु आता याबाबत स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांनी या प्रकरणी ट्वीट करत स्पष्टीकरण दिले. त्याशिवाय त्यांनी याबाबत पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे. कोणीही अशा प्रकारचा खोडसाळपणा करू नये, तसेच कोणाच्याही अपप्रचाराला मराठा समाजाने बळी पडू नये, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आले आहे. (CM Eknath Shinde appeals to Maratha community not to fall prey to anyone’s propaganda)

हेही वाचा – खरंतर हीच ती गद्दार वृत्ती! ‘त्या’ व्हिडीओवरून आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा

- Advertisement -

पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मराठा आरक्षणासंदर्भात सोमवारी (ता. 11 सप्टेंबर) रात्री एक सर्वपक्षीय बैठक उशीरा घेण्यात आली. ही बैठक सह्याद्री अतिथीगृहामध्ये घेण्यात आली होती. पहिल्यांदाच मराठा आरक्षणासंदर्भात ही सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली होती. एक साधक बाधक चर्चा त्या बैठकीमध्ये झाली. राज्यात कायदा व सुव्यवस्था, शांतता प्रस्थापित झाली पाहिजे. या राज्यात सर्व जाती-धर्माचे लोक हे गुण्यागोविंदाने राहतात. त्या दृष्टीने ही बैठक झाली. या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करताना आम्ही बोलत बोलत येत होतो, ज्या मुद्यावर चर्चा झाली, जी सकारात्मक आणि प्रॅक्टिकल मुद्यांवर चर्चा झाली यावरच बोलूया, राजकीय विषय नको अशी आमची चर्चा सुरू होती.

तसेच, कोणतेही राजकीय भाष्य, प्रश्नोत्तरे आज नको अशी चर्चा आम्ही करत होतो. सर्वपक्षीय बैठकीमध्ये मनोज जरांगे आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भात जी चर्चा घडली तेच पत्रकार परिषदेत सांगू, असा आमचा विषय सुरू होता. परंतु काही लोक सोशल मीडियावर काहीही अर्थ काढून, संभ्रमाचे वातावरण तयार होईल, मराठा समाजाला आरक्षण देताना त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण करू पाहत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून काही विघ्नसंतोषी लोक संभ्रम पसरवण्याचे काम करत आहेत, असे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांच्या काळात आरक्षण मिळाले होते. कायद्याने ते टिकले नाही. ते कोणामुळे आणि का टिकले नाही, हे आता सांगण्याची वेळ नाही. आज सरकारच्यावतीने 3 हजार 700 नोकऱ्या आम्ही मराठा समाजाला दिल्या होत्या. मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची प्रामाणिक भूमिका आहे, यासाठीच त्यादिवशी सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. मात्र, सोशल मीडियाच्या माध्यमातून मराठा समाजातील लोकांना संभ्रमित करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मला सांगायचे आहे की, याला कुणीही बळी पडू नका. सरकार याबाबतीत गंभीर आहे. दिशाभूल करण्याच्या प्रकाराला बळी पडू नये. जे असे प्रयत्न करत आहेत त्यांनाही मला सांगायचे आहे की राज्यात सुव्यवस्था राखायची आहे. त्यामुळे असा खोडसाळपणा कोणी करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -