घरताज्या घडामोडीस्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रातील ७८ पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पदकांची घोषणा, मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रातील ७८ पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पदकांची घोषणा, मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

Subscribe

पोलीस दलाच्या ब्रिद वाक्याला जागून या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावून महाराष्ट्राच्या गौरवात भर घातली आहे,असे म्हणत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्यात.

केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातील १,३८० पदक विजेत्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची यादी जाहीर केली. यात महाराष्ट्रातील ७८ पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. पोलीस सेवेतील योगदानासाठी पोलीस शौर्य पदक, राष्ट्रपती पोलीस पदक आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदके देण्यात आली. महाराष्ट्रातील या सर्व विजेत्या ७८ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मुख्यंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले. महाराष्ट्रातील ३ पोलीस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ देण्यात आले आहे. तर २५ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ‘पोलीस शौर्य पदक’ आणि ४५ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक तसेच ११ पोलीस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट तपासासाठी ‘केंद्रीय गृहमंत्री पदक’ देण्यात आले आहे. याशिवाय राज्याच्या अग्निशमन दलातील आठ अग्निशन अधिकारी, कर्मचाऱ्यांना ‘अग्निशमन सेवा शौर्य पदक’ जाहीर झाले आहे. या सर्वांचेही ठाकरे यांनी अभिनंदन, तसेच त्यांच्या धडाडीचे कौतुक केले आहे.(CM Uddhav thackeray congratulated home minister announces medal for 78 police officers and employees in state)

महाराष्ट्र पोलीस दलाचा आम्हाला अभिमान आहे. पोलीस दलाच्या ब्रिद वाक्याला जागून या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावून महाराष्ट्राच्या गौरवात भर घातली आहे,असे म्हणत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्यात.

- Advertisement -

हेही वाचा – संजय राठोडांचा पाय खोलात, तक्रारदार महिला पोहचली पोलीस ठाण्यात

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -