घरक्रीडा'गोल्डन बॉय' नीरज चोप्राला स्वातंत्र्य दिनाची खास भेट

‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्राला स्वातंत्र्य दिनाची खास भेट

Subscribe

मुंबईतील प्रसिद्ध मोझॅक कलाकार चेतन राऊतने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून नीरजची खास मोझॅक कलाकृती तयार केली आहे.

भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली. मागील शनिवारी झालेल्या भालाफेकीच्या अंतिम फेरीत नीरजने ८७.५८ मीटर अंतराची नोंद करत सुवर्णपदकाची कमाई केली. ऑलिम्पिकच्या अ‍ॅथलेटिक्स स्पर्धांत सुवर्णपदक जिंकणारा तो पहिलावहिला भारतीय खेळाडू ठरला होता. या ऐतिहासिक कामगिरीनंतर त्याच्यावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. आता मुंबईतील प्रसिद्ध मोझॅक कलाकार चेतन राऊतने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून नीरजची खास मोझॅक कलाकृती तयार केली आहे.

- Advertisement -

रविवारी देशभरात स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे. त्या निमित्ताने जे. जे. आर्टचा विद्यार्थी असलेल्या चेतन राऊतने २१ हजार पुश पिन्सच्या साहाय्याने नीरजचे ४ फुट लांब आणि ४ फुट रुंदीचे मोझॅक चित्र तयार केले आहे. ही कलाकृती साकारण्यासाठी त्याला १२ तासांचा अवधी लागला. चेतनला मयूर अंधेर, सिद्धेश रबसे, तनवी गडदे, प्रमिला जंगले या तरुणांचीही मदत लाभली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -