Friday, June 18, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर महाराष्ट्र राज-उद्धव एकत्र येणार का? मुख्यमंत्री म्हणतात, 'काळ कठीण, सर्वांनी एकत्र येणं आवश्यक'

राज-उद्धव एकत्र येणार का? मुख्यमंत्री म्हणतात, ‘काळ कठीण, सर्वांनी एकत्र येणं आवश्यक’

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकत्र कधी येणार? हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चिला जाऊ लागला आहे. या प्रश्नावर राज ठाकरे यांनी परमेश्वराकडे बोट दाखवल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी सूचक असं उत्तर दिलं आहे.

दैनिक लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांना उद्धव-राज एकत्र येणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना “ज्या गोष्टी परमेश्वराला माहिती असतील, त्या मला माहिती असणं शक्य नाही,” असं म्हणाले. देशासाठी, राज्यासाठी जे एकत्र येऊ शकतात, त्यांनी आताच्या घडीला एकत्र यावं, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

व्यापक प्रयत्न म्हणून ममता, जगनमोहन रेड्डी यांना हाक देत आहात. मग संभाव्य खेळाडू मनसे असू शकतो का? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, “देशासाठी, राज्यासाठी जे एकत्र येऊ शकतात, त्यांनी आताच्या घडीला एकत्र यावं, सध्या देशात जे संकट आहे ते साधंसुधं नाही, या परिस्थितीला योग्यप्रकारे सामोरं गेलो नाही तर देशात अराजक येईल.” पुढे बोलताना मुख्यमंत्री “लॉकडाऊन किती काळ चालवायचा माहिती नाही, माझी प्राथमिकता जीव वाचवण्याला आहे, घरचा कर्ता पुरुष गेला तर अर्थचक्राला काय अर्थ? माझं म्हणणं आहे जे जे या विचारासाठी एकत्र येऊ शकतात, त्यांनी एकत्र यायला हवं, राजकारण थांबवावं,” असं म्हणाले.

राज ठाकरे काय म्हणाले होते? 

तुम्ही दोन्ही भाऊ एकत्र येणार का?, असा प्रश्न राज ठाकरे यांना विचारण्यात आला. त्यावर राज ठाकरे यांनी दोन्ही हात आकाशाकडे दाखवत ‘परमेश्वरालाच ठाऊक’ असं उत्तर दिलं. त्यावर तुम्ही परमेश्वराला मानता का? असा सवाल करण्यात आला. तेव्हा, म्हणजे काय? परमेश्वराला मानतो म्हणूनच परमेश्वरालाच ठाऊक असं म्हणालो.

- Advertisement -

अशा गोष्टी परमेश्वरावर सोडून द्यायच्या नसतात – राऊत

राज ठाकरेंनी शिवसेना-मनसे युती संदर्भात मिश्कीलपणे केलेल्या एका वक्तव्यानंतर या चर्चेला अधिक उधाण आले. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.

“परमेश्वर हा कुठल्याही पक्षाचा मेंबर नसतो, तो कधीच मध्यस्थाची भूमिका घेत नाही. त्यामुळे अशा गोष्टी या परमेश्वरावर सोडून द्यायच्या नसतात. जो परमेश्वरावर विसंबून राजकारण करतो त्याला स्वत: परमेश्वरही मदत करत नाही. राजकारण हे आपलं आपण करायचं असतं”, असा टोला संजय राऊत यांनी राज ठाकरेंना लगावला आहे. दरम्यान, संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतर मनसेची काय प्रतिक्रिया येईल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

 

- Advertisement -