घरमहाराष्ट्र'शेतकऱ्यांनी कमी दरात तूर विकू नये'

‘शेतकऱ्यांनी कमी दरात तूर विकू नये’

Subscribe

'शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना कमी दरात तूर विकू नये', असे आवाहन पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी केले आहे.

गेल्या दोन वर्षांपूर्वी तूरडाळच्या हमीभावावरुन शेतकरी आणि सरकार यांच्यात मोठा संघर्ष उफाळला होता. सरकारने शेतकऱ्यांना तूरडाळचे उत्तपन्न घेण्यासाठी प्रवृत्त केले होते. परंतु, जेव्हा तूरडाळला हमीभाव देण्याचा प्रश्न आला, तेव्हा शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली होती. त्यामुळे सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका केली गेली होती. आता मात्र सरकारने तूर खरेदीसाठी राज्यात मोठ्या प्रमाणात खरेदी केंद्र उभारण्याचा संकल्प केला आहे. आतापर्यंत सरकारने राज्यात १३४ तूर खरेदी केंद्र सुरु केली आहेत. ‘राज्यातील शेतकऱ्यांनी आधारभूत किंमतीपेक्षा कमी दरात व्यापाऱ्यांना तूर विक्री करु नये’, असे आवाहन राज्याचे पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी केले आहे.

काय असणार तूरचा भाव?

केंद्र शासनाने यावर्षी तुरीची आधारभूत किंमत क्विंटलमागे ५ हजार ६७५ रुपये इतकी निश्चित केली आहे. राज्यात आधारभूत किंमतीने तूर खरेदी केली जावे यासाठी सरकारने आतापर्यंत १३४ तूर खरेदी केंद्र सुरु केली आहेत. या केंद्रावर आतापर्यंत १७ हजार २६४ शेतकऱ्यांनी तूर खरेदीसाठी नोंदणी केली आहे. तसेच काही खरेदी केंद्र सुरू करण्याचे प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे ‘शेतकऱ्यांनी आधारभूत किंमतीपेक्षा कमी दरात व्यापाऱ्यांना तूर विक्री करु नये’, असे आवाहन पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी केले आहे.

- Advertisement -

‘तर व्यापाऱ्यांवर कारवाई होईल’

यावर्षी राज्यातील तुरीचे उत्पादन कमी प्रमाणात  आहे. ‘ज्या भागात तुरीचे उत्पादन जास्त आहे, अशा भागात खरेदी केंद्र सुरू करावे’, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. त्यामुळे त्या भागांमध्ये खरेदी केंद्र लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. ‘शेतकऱ्यांनी आधारभूत किंमतीपेक्षा कमी दराने व्यापाऱ्यांना तूर विक्री करु नये आणि ही विक्री करीत असताना शेतकऱ्यांनी आपला सातबारा उतारा व्यापाऱ्यांना देऊ नये. जर आधारभूत किंमतीपेक्षा कमी दराने व्यापारी तूर खरेदी  करत असतील तर अशा व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल’, असे सुभाष देशमुख यांनी सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -