घरमहाराष्ट्रशिवसेना आमदार गौतम चाबुकस्वार यांच्या विरोधात दखलपात्र गुन्हा दाखल

शिवसेना आमदार गौतम चाबुकस्वार यांच्या विरोधात दखलपात्र गुन्हा दाखल

Subscribe

शिवसेनेचे पिंपरी-चिंचवडमधील आमदार गौतम चाबुकस्वार यांच्याविरोधात दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जुलै महिन्यात किरकोळ कारणावरून अपहरण करून हितेश मूलचंदानी या तरुणाचा खून करण्यात आला होता. या घटनेप्रकरणी आरोपी जेरबंद देखील झाले आहेत. मात्र, या घटनेने वेगळे वळण घेतले असून या खुनाच्या गुन्ह्यात सहभाग असल्याचा आरोप करून व्हाट्सअॅपवर राष्ट्रवादीचे नगरसेवक डब्बू आसवानी यांची बदनामी केल्याप्रकरणी शिवसेना आमदार गौतम चाबुकस्वार यांच्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी नगरसेवक डब्बू आसवानी यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ऑडिओ क्लिपमध्ये चाबुकस्वार यांचा आवाज!

यावेळी डब्बू आसवानी यांनी पत्रकार परिषद घेऊन याची माहिती दिली. मयत तरुणांच्या वडिलांना माझ्या विरोधात न्यायालयात आणि पोलिसात जबाब द्यावा असा दबाव आणला जात असल्याचा आरोप नगरसेवक डब्बू यांनी केला. शिवाय, आमदार गौतम चाबुकस्वार यांनी व्हाट्सअॅपवर खुनात माझा सहभाग असल्याचे पसरवले आहे. याप्रकरणी शिवसेना आमदार गौतम चाबुकस्वार यांच्या विरोधात पिंपरी पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन महिन्यांवर विधानसभा निवडणूक येऊन ठेपली आहे. पिंपरीत माझे प्राबल्य असल्याने ते मला या प्रकरणात अडकवत असल्याचे नगरसेवक डब्बू यांनी म्हटले आहे. दरम्यान, त्यांनी एक ऑडिओ क्लिप सादर केली असून यात खुद्द शिवसेना आमदार गौतम चाबुकस्वार यांचाच आवाज आहे. त्यात डब्बू आसवाणी हे पोलिसांना सोबत घेऊन तुम्हाला फसवत असल्याचे म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – वाढदिवसाच्या पार्टीत माजी नगरसेवकाच्या पुतण्याची हत्या

जे सत्य असेल, ते बाहर येईल – चाबुकस्वार

दरम्यान, या प्रकरणी शिवसेना आमदार गौतम चाबुकस्वार यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, ‘संबंधित क्लिपमधील माझा आवाज नाही. माझा आवाज कोणीही ओळखेल. पिंपरीत झालेल्या आंदोलनात सहभाग घेतला होता. त्यानंतर पिंपरी विधानसभेचा प्रतिनिधी म्हणून त्यांच्या घरी गेलो होतो. तेव्हा, कार्यकर्ते सोबत होते. त्यानंतर खासदारांसोबत त्यांच्या घरी गेलो होतो. त्यानंतर त्यांचं-माझं संभाषण झालेले नाही. जे सत्य असेल ते बाहेर येईल’.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -