घरCORONA UPDATEमहाराष्ट्राच्या कोरोना मृत्यूदराच्या अभ्यासासाठी समिती!

महाराष्ट्राच्या कोरोना मृत्यूदराच्या अभ्यासासाठी समिती!

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये वेगाने कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याचं चित्र दिसून येत आहे. भारतामध्ये सर्वाधिक कोरोनाग्रस्त हे महाराष्ट्रात आहेत. राज्यात आत्तापर्यंत २ हजार ३३४ कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे यातले १५४९ रुग्ण हे मुंबईत आढळले आहेत. आख्ख्या देशात महाराष्ट्रात मृतांचा आकडा देखील जास्त आहे. राज्यात आत्तापर्यंत १६० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर ७ टक्क्यांपर्यंत गेलेला राज्याचा कोरोना मृत्यूदर प्रशासन आणि सरकारसाठी देखील काळजीचा विषय ठरला आहे. विशेषत: मुंबईतल्या मृतांचा आकडा १०० वर गेल्यामुळे त्यात भरच पडली आहे. त्यामुळे आता यावर एक समिती गठित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांच्या झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार, राज्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण जास्त का आहे? याचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांची एक समिती गठित करण्यात येणार आहे. ही समिती सरकारला आपला अहवाल सादर करेल. या चर्चेमध्ये राज्यातल्या रुग्णांना हायपर टेन्शन, डायबेटिज, अस्थमा असे इतर आजार असल्यामुळे या रुग्णांचे मृत्यू होण्याचं प्रमाण जास्त असल्याचं निदर्शनास आलं. मात्र, तरीदेखील याचा अधिक सखोल अभ्यास करण्यासाठी या समितीची नियुक्ती केली जाणार आहे.

- Advertisement -

दरम्यान, राज्यातल्या कोरोनावर उपचार करणाऱ्या रुग्णालयांमध्ये मधुमेह, हायपरटेन्शन सारख्या इतर आजारांवर उपचार करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर कमी पडत असल्यामुळे आता सरकारी रुग्णालयातल्या डॉक्टरांसोबत खासगी क्षेत्रातील डॉक्टर देखील अशा रुग्णांवर उपचार करणार आहेत. अशा उपचारांमध्ये या खासगी डॉक्टरांची मदत घेतली जाणार आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण मुंबईत असून मुंबईतील एकूण रुग्णांचा आकडा २ हजार ३३४पर्यंत पोहोचला आहे. त्यामध्ये आज दिवसभरात १५० नव्या रुग्णांची भर पडली असून ९ जणांचा मृत्यू झाला आहे. यासह मुंबईतल्या मृतांचा आकडा १००वर गेला आहे. त्यामुळे मुंबईत लॉकडाऊनचे नियम शिथिल होण्याची शक्यता कमी असल्याचं दिसून येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -