घरताज्या घडामोडीऋतुजा लटकेंविरोधात लाच मागितल्याची तक्रार दाखल, राजीनामा प्रकरणात मोठा ट्विस्ट

ऋतुजा लटकेंविरोधात लाच मागितल्याची तक्रार दाखल, राजीनामा प्रकरणात मोठा ट्विस्ट

Subscribe

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. परंतु त्यांच्या राजीनाम्याबाबत एक मोठा ट्विस्ट समोर आला आहे. लटकेंविरोधात चौकशी प्रलंबित असल्यामुळे त्यांच्याविरोधात लाच मागितल्याची तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयाला दिली. त्यांच्याविरोधात काल बुधवारी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

एका तक्रारदारानं लटकेंच्या विभागीय चौकशीची मागणी केली आहे. लटके यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. मुंबई महापालिकेच्या वकिलांनी लटके यांचा युक्तिवाद फेटाळून लावण्याचा प्रयत्न केला. एक महिन्याचा नोटीस पिरियड पूर्ण करावा लागेल, असे महापालिकेच्या वकिलांनी सांगितले. तसेच त्यांच्याविरोधात चौकशी प्रलंबित असल्याची माहिती महापालिकेने मुंबई उच्च न्यायालयाला दिली. परंतु यावर उच्च न्यायालयाने तक्रारीची माहिती मागितली.

- Advertisement -

दुसरीकडे महापालिकेनं म्हटलं आहे की, लटकेंविरोधातील चौकशी सुरु राहिल. तुम्हाला अर्ज भरायचा असेल तर तुम्ही भरु शकता तो तुमचा निर्णय आहे.

ऋतुजा लटके यांच्या वकिलांनी सुद्धा युक्तिवाद केला. २ सप्टेंबर रोजी लटकेंनी आपला राजीनामा दिला. त्यानंतर २९ सप्टेंबर रोजी त्यांच्या राजीनामा फेटाळण्यात आला. ३ ऑक्टोबर रोजी अंधेरी पूर्व पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. त्यामुळे नियमांनुसार आम्ही महापालिकेकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. एक महिन्याचा नोटीस पिरियड पूर्ण करायचा नसेल तर महिन्याचा पगार द्यावा लागेल असे सांगण्यात आले. मात्र, एका महिन्याचा पगारही कोषागरात जमा केल्याचे लटकेंच्या वकिलांनी सांगितले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : ऋतुजा लटकेंना न्यायालयाचा दिलासा, राजीनामा मंजूर करण्याचे आदेश


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -