घरताज्या घडामोडीभाजपाच्या कार्यकारणीकडून मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे अभिनंदन

भाजपाच्या कार्यकारणीकडून मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे अभिनंदन

Subscribe

प्रदेश कार्यसमिती बैठक आज पनवेलच्या आद्यक्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झाली. याबाबत माहिती देताना आमदार अँड आशिष शेलार यांनी सांगितले की,आजच्या बैठकीत तीन प्रस्ताव संमत झाले, राजकीय, कृषी विषयक आणि ओबीसी राजकीय आरक्षण हे तीन प्रस्ताव मंजूर करण्यात आले.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाच्या विचारांचा वारसा घेऊन युतीतून जन्माला आलेल्या सरकारचे नेतृत्व करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्ष कार्यकर्त्यांना त्यागाचा आदर्श घालून देणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव आजच्या भाजपाच्या प्रदेश भाजपा कार्यसमितीत मंजूर करण्यात आल्याची माहिती भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी दिली. (Congratulations to CM Shinde and DCM Fadnavis from BJP executive)

प्रदेश कार्यसमिती बैठक आज पनवेलच्या आद्यक्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झाली. याबाबत माहिती देताना आमदार अँड आशिष शेलार यांनी सांगितले की,आजच्या बैठकीत तीन प्रस्ताव संमत झाले, राजकीय, कृषी विषयक आणि ओबीसी राजकीय आरक्षण हे तीन प्रस्ताव मंजूर करण्यात आले.

- Advertisement -

राजकीय प्रस्ताव मांडताना गेल्या अडीच वर्षात मविआ सरकारने राज्यात केलेल्या अधोगतीवर चर्चा करण्यात आली. भाजपा नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी हा प्रस्ताव मांडला तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारातील शिवसेनेने केलेला उठाव व स्थापन झालेल्या सरकारचे अभिनंदन करण्यात आले. या सरकारने तीस दिवस पुर्ण होण्या आधीच इंधन दर कपात, ओबीसी आरक्षण, शेतकऱ्यांना प्रोत्साहन असे वेगवेगळे निर्णय घेतले तर छत्रपती संभाजी नगर, धाराशिव , लोकनेते दि.बा. पाटील विमानतळाचे नामकरण असो वा गणेशोत्सव, दहीहंडी व मोहरम सारख्या सणांचा निर्णय घेतले. ज्या गतीने सरकार काम करत आहे. पहिल्या तीन कॅबिनेटमध्ये महाराष्ट्र हिताच्या निर्णयांची मालिका शिंदे – फडणवीस सरकारने घेतली त्याबद्दल सरकारचे अभिनंदन या ठरावात करण्यात आले.

स्वतंत्र्यांच्या अमृत महोत्सवा निमित्ताने घर घर तिरंगा या अभियानासह सशक्त बुथ यंत्रणा,आगामी निवडणुकांसाठी भाजपाची व्यूहरचना,ज्या बूथवर कमी मतदान झाले, त्याठिकाणी मतदान वाढवण्यासाठी काम करणार,ग्राम पंचायत व जिल्हा परिषद निवडणुकीत हा विचार घेऊन संघटनात्मक रचना याबाबत सविस्तर चर्चा ही यावेळी करण्यात आल्याची माहिती आमदार अँड आशिष शेलार यांनी दिली. प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यावेळी उपस्थित होते.

- Advertisement -

हेही वाचा – शिवसेना आणि राष्ट्रवादीने एकत्र येण्याचे आधीच ठरवले होते, फडणवीसांचा गंभीर आरोप

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -