घरमहाराष्ट्रCongress 2nd list : काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातून चौघांना संधी

Congress 2nd list : काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातून चौघांना संधी

Subscribe

मुंबई : लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊन सात दिवस झाले तरी महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. असे असले तरी काँग्रेसने आज (23 मार्च) आज आपली चौथी यादी जाहीर केली आहे. यात महाराष्ट्रातील 4 उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. याआधी काँग्रेसने 7 उमेदवारांना संधी दिली होती. (Congress 2nd list Four candidates from Maharashtra get a chance in the second list of Congress)

हेही वाचा – Akola Assembly Constituency: पोटनिवडणुकीत काँग्रेसची गुन्हेगाराला उमेदवारी; प्रवीण दरेकरांची टीका

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची चौथी यादी जाहीर झाली आहे. यामध्ये 46 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. या यादीत मध्य प्रदेशच्या 12, उत्तर प्रदेश 9, तामिळनाडू 8, महाराष्ट्र 4, राजस्थान 3 यासह मणिपूर, जम्मू-काश्मीर आणि उत्तराखंडच्या प्रत्येकी दोन लोकसभा जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. याशिवाय पश्चिम बंगाल, आसाम, छत्तीसगड, अंदमान-निकोबार आणि मिझोराममधील प्रत्येकी एका लोकसभा जागेसाठी उमेदवारांची नावेही जाहीर करण्यात आली आहेत.

- Advertisement -

2014च्या मोदी लाटेत काँग्रेसला महाराष्ट्रात अवघ्या दोन जागा मिळाल्या, पण 2019मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था आणखीच दयनीय झाली. पक्षाला केवळ एक जागेवर समाधान मानावे लागले. म्हणूनच आता काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रेचा लाभ घेण्याबरोबरच निवडणुकीच्या रिंगणात तगडे उमेदवार उतरविण्याची रणनीती काँग्रेसने आखली आहे. याचपार्श्वभूमी काँग्रेसने महाराष्ट्रातील आपल्या दुसऱ्या यादीत नागपूरमधून विकास ठाकरे, रामटेकमधून रश्मी बर्वे, गडचिरोली नामदेव किरसान, भंडारा-गोंदिया प्रशांत पडोले या 4 उमेदवरांना संधी दिली आहे.

हेही वाचा – Amol Kolhe : त्यांना जर बदला वाटत असेल तर मायबाप जनता सुज्ञ; अमोल कोल्हेंचे आढळराव पाटलांना प्रत्युत्तर

याआधी काँग्रेसने देशभरातील उमेदवारांच्या आपल्या तिसऱ्या यादीत महाराष्ट्रातून 7 उमेदवारांना संधी दिली होती. कोल्हापूर मतदार संघातून शाहू महाराज, पुण्यातून रवींद्र धंगेकर, नंदुरबारमधून गोवाल पाडवी, सोलापूरमधून प्रणिती शिंदे, लातूरमधून शिवाजी कालगे, नांदेडमधून वसंत चव्हाण आणि अमरावतीमधून बळवंत वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र काँग्रेसने आतापर्यंत महाराष्ट्रातून 11 उमेदवारांच्या नावाची घोषणा करताना अद्यापही चंद्रपूर या वादग्रस्त ठरू शकणाऱ्या मतदारसंघातून उमेदवार जाहीर केलेला नाही. चंद्रपूरमधून दिवंगत बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांनी दावा केला आहे, तर विधान विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार आणि त्यांची कन्या शिवानी वडेट्टीवार इच्छुक आहे. त्यामुळे आता काँग्रेस आपली पाचली यादी जाहीर करताना चंद्रपूरमधून प्रतिभा धानोरकर यांना संधी देते का? हे पाहावे लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -