घरभविष्यसाप्ताहिक राशीभविष्यराशीभविष्य : रविवार २४ मार्च ते शनिवार ३० मार्च २०२४

राशीभविष्य : रविवार २४ मार्च ते शनिवार ३० मार्च २०२४

Subscribe

मेष ः या सप्ताहात गुरू ग्रह वृश्चिकेत वक्री होत आहे. सूर्य हर्षल युती होत आहे. तुमच्या राजकीय-सामाजिक कार्याला मिळालेली दिशा प्रगतीकारक असेल. होळीचा सण उत्साहात साजरा कराल. धूलिवंदनाच्या दिवशी व्यसनात राहून वागल्यास नुकसान होईल. धावपळीमुळे सप्ताहाच्या सुरुवातीला प्रकृतीकडे दुर्लक्ष होईल. काळजी घ्या. प्रवासात सावध राहा, संसारातील वाद चव्हाट्यावर आणू नका. धंद्यात नोकर माणसांच्या कुरबुरी वाढतील. व्यवहारात भावनेला स्थान नसते. मैत्रीत दुरावा संभवतो. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. दादागिरीने वागून तुम्ही वाईट होऊ नका. संशोधनात यश मिळेल. वरिष्ठांना दुखवू नका. विद्यार्थ्यांनी चांगली संगत ठेवून परिश्रम घ्यावेत. शुभ दि. २४, २८

वृषभ ः या सप्ताहात गुरू ग्रह वृश्चिकेत वक्री होत आहे. सूर्य, शुक्र त्रिकोणयोग होत आहे. गुरूबल नव्याने सुरू झाले आहे. धंद्यात वाढ करता येईल. होळीच्या सणाला चांगली बातमी कळेल. धूलिवंदनाला व्यसन करू नका. राजकीय-सामाजिक कार्यात मेहनत घ्या. यश मिळेल. लोकांच्या बरोबर चर्चा करा. सौम्य धोरण ठेवा. अरेरावी करू नका. कला-क्रीडा क्षेत्रात ओळखी वाढल्याने उत्साह वाढेल. नवे काम मिळेल. घरातील समस्या सोडवता येईल. सप्ताहाच्या मध्यावर रागावर ताबा ठेवा. प्रवासात घाई करू नका. संशोधनाच्या कामात दगदग होईल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षेत्रात पुढे जाता येईल. कोर्ट केसमध्ये नम्रपणेच बोला. शुभ दि. २५, २९

- Advertisement -

मिथुन ः- या सप्ताहात गुरू ग्रह वृश्चिकेत वक्री होत आहे. सूर्य, हर्षल युती होत आहे. गुरूबल कमी झाले आहे. धंद्यात जम बसेल असे काम मिळेल. नवीन परिचय उपयुक्त ठरेल. प्रत्येक कार्यात राग वाढणार नाही याची काळजी घ्या. क्षुल्लक तणाव होऊ शकतो. सहनशीलता ठेवा. वाहन जपून चालवा. होळीचा सण उत्साह, आनंद देईल. धूलिवंदन नीट साजरे करा. राजकीय-सामाजिक कार्यात प्रतिष्ठा टिकवता येईल. संसारात मुलांच्या प्रगतीने बरे वाटेल. नोकरीत बदल करण्याची संधी मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात कौतुक होईल. संशोधनाच्या कामात यश येईल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे प्रयत्न चालू ठेवावेत. यश खेचावे लागेल. शुभ दि. २६, ३०

कर्क ः- या सप्ताहात वृश्चिक राशीत वक्री होणार्‍या गुरू ग्रहामुळे तुम्हाला गुरूचे पाठबळ पुन्हा मिळणार आहे. चंद्र, शुक्र त्रिकोणयोग होत आहे. सप्ताहाच्या मध्यावर गुप्त कारवायांचा त्रास होईल. धंदा वाढवता येईल. थकबाकी मिळवता येईल. होळीचा सण उत्साहात साजरा कराल. धूलिवंदनाला व्यसन करू नका. कोर्ट केस संपवण्याचा प्रयत्न करा. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. पैसा मिळेल. घरातील वाद मिटवता येईल. वाटाघाटीचा प्रश्न सुटेल. नोकरीत बदल होऊ शकेल. संशोधनाच्या कामात यश मिळेल. नवीन ओळख होईल. प्रेमाला चालना मिळेल. परदेशात जाण्यासाठी तयारी करता येईल. परीक्षेत यश येईल. वास्तू, वाहन खरेदी-व्रिकी लाभदायक ठरेल. शुभ दि. २४, २७

- Advertisement -

सिंह ः- या सप्ताहात गुरू ग्रह वृश्चिकेत वक्री होत आहे. सूर्य, हर्षल युती होत आहे. घरातील कामामुळे तुमच्या मनावर ताण येईल. त्यामुळे प्रत्येक काम करताना, निर्णय घेताना सावधपणे घ्या. बोलताना बेसावध राहू नका. होळीच्या दिवशी आनंदी वातावरण राहील. धूलिवंदन दिवशी व्यसन करू नका. व्यसनाने नुकसान होईल. राजकीय-सामाजिक कार्यात तारेवरची कसरत करावी लागेल. संसारात गैरसमज होईल. शांततेतून मार्ग काढा. कला-क्रीडा क्षेत्रात नाव मिळेल. जवळचे लोक दुखावण्याची शक्यता आहे. प्रेमात तणाव होईल. संशोधनाच्या नादात अहंकारी वृत्तीने वागल्यास समस्या वाढेल. विद्यार्थ्यांनी सरळ मार्गाने अभ्यास करावा. शुभ दि. २५, २८

कन्या ः- या सप्ताहात गुरू ग्रह वृश्चिकेत वक्री होत आहे. चंद्र, शुक्र त्रिकोणयोग होत आहे. तुमची बरीच कामे मार्गी लावता येतील. धंद्यात सुधारणा होईल. कायद्याचे पालन करा. थकबाकी मिळवता येईल. होळीच्या सणाला मोठी खरेदी कराल. धूलिवंदनाच्या दिवशी व्यसनाच्या नादी लागू नका. राजकीय-सामाजिक कार्यात प्रभाव वाढेल. लोकांची कामे प्रामाणिकपणे करा. त्यांच्या समस्या सोडवा. घरातील व्यक्ती तुमच्या पाठीशी असतील. नवे लोक जवळीक करतील. कला-क्रीडा क्षेत्रात मेहनत घ्या. कौतुक होईल. घर, वाहन, जमीन खरेदी-विक्रीत फायदा होईल. संशोधनाच्या कामात प्रगती होईल. विद्यार्थी वर्गाने मोठ्यांच्या बरोबर नीट वागावे. यश मिळेल. शुभ दि. २६, २९

तूळ ः- या सप्ताहात गुरू ग्रह वृश्चिकेत वक्री होत आहेत. सूर्य हर्षल युती होत आहे. तुमच्या सर्व कार्याला वेग येईल. कठीण कामे करून घ्या. होळीचा सण उत्साहात साजरा कराल. धूलिवंदनाच्या दिवशी तारतम्य ठेवा. वाहवत जाऊ नका. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वरिष्ठांना कळेल. पदाधिकार मिळेल. सहकारी थोडी कुरबुर करतील. सहनशीलता ठेवा. राग वाढवू नका. प्रत्येक दिवशी तुम्हाला यश मिळेल. नोकरी मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात पुरस्कार व पैसा मिळेल. कोर्ट केस जिंकाल. नवीन ओळख झाली तरी सावधपणे व्यवहार करा. संशोधनाच्या कामात प्रगती होईल. विद्यार्थ्यांना मोठे यश मिळवता येईल. वाहन, घर खरेदीचा विचार कराल. शुभ दि. २७, ३०

वृश्चिक ः या सप्ताहात तुमच्याच राशीत गुरू ग्रह वक्री होत आहे. चंद्र, शुक्र त्रिकोणयोग होत आहे. जीवनात कलाटणी देणारी घटना घडेल. अविवाहितांना स्थळे मिळतील. जोडीदाराची योग्य निवड करता येईल. होळीच्या सणा दिवशी आनंद, उत्साह द्विगुणीत होईल. धूलिवंदनाच्या दिवशी व्यसन करू नका. काही ठिकाणी तुमच्यावर आरोप होतील. संयम बाळगा. शांततेतून मार्ग काढा. कला-क्रीडा क्षेत्रात लोकांना तुमचे आकर्षण वाटेल. आर्थिक लाभ होईल. शेअर्समध्ये फायदा होईल. कोर्ट केस सोपी नसली तरी आशादायक वातावरण राहील. संशोधनाच्या कामात यश जिद्दीने मिळेल. घरातील व्यक्तींना खूश ठेवता येईल. विद्यार्थ्यांची प्रगती होईल. शुभ दि. २४, २६

धनु ः या सप्ताहात गुरू ग्रह वृश्चिकेत वक्री होत आहे. सूर्य, हर्षल युती होत आहे. धंद्यात स्वतःच लक्ष द्या. फायदा मिळवता येईल. होळीचा सण उत्साहात साजरा कराल. धूलिवंदनाच्या दिवशी व्यसनाच्या नादी लागू नका. राजकीय-सामाजिक कार्यात सावधपणे निर्णय घ्या. बोलताना कायदा पाळा. योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या. कला-क्रीडा क्षेत्रात नावलौकिक वाढेल. आर्थिक लाभ होईल. कोणाच्याही सांगण्यावरून एखाद्या व्यक्तीबाबत स्वतःचे मत बनवू नका. दुसर्‍याच्या भरवशावर राहून शेळ्या हाकू नका. कोर्ट केसमध्ये सावध राहा. संशोधनाच्या कामात यश मिळेल. बुद्धीचा वापर करा. नोकरीत कायद्याचे पालन करा. शुभ दि. २५, २७

मकर ः- या सप्ताहात गुरू ग्रह वृश्चिकेत वक्री होत आहे. चंद्र, शुक्र त्रिकोणयोग होत आहे. धंद्यातील समस्या कमी करून नव्याने बस्तान बसवता येईल. मोठे काम मिळेल. होळी सणाला आनंददायी वातावरण राहील. धूलिवंदनाच्या दिवशी कोणतेही व्यसन घातक ठरेल. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्हाला प्रतिष्ठा मिळेल. नवीन दिग्गज लोकांचा परिचय होईल. आर्थिक सहाय्य मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात उत्साहवर्धक घटना घडेल. कला क्षेत्रात विशेष यश मिळेल. कोर्ट केस संपवण्याचा प्रयत्न करा. नोकरीत बदल करण्याची संधी मिळेल. सप्ताहाच्या मध्यावर क्षुल्लक तणाव होईल. कायदा मोडू नका. संशोधनात यश मिळेल. विद्यार्थी वर्गाने अभ्यासात आळस करू नये. शुभ दि. २६, २८

कुंभ ः- या सप्ताहात वृश्चिक राशीत गुरू ग्रह वक्री होत आहे. सूर्य, हर्षल युती होत आहे. या सप्ताहात तुम्ही तुमची कामे करून घ्या. धंद्यात मोठा बदल करू शकाल. शेअर्समध्ये गुंतवणूक करता येईल. लाभ मिळेल. होळीचा सण परिवारासोबत आनंदाने साजरा कराल. धूलिवंदनाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकडे लक्ष द्या. राजकीय-सामाजिक कार्यात तुमची प्रतिष्ठा वाढेल. कला, क्रीडा क्षेत्रात चमकदार यश मिळेल. नवीन लोकांचा सहवास मिळेल. कोर्ट केस संपवता येईल. संशोधनाच्या कामात प्रगती होईल. नोकरी लागेल. संसारात शुभ समाचार मिळेल. घर, वाहन इत्यादी मोठ्या खरेदी-व्रिकीत फायदा होईल. शिक्षणात प्रगती होईल. शुभ दि. २७, २९

मीन ः- या सप्ताहात गुरू ग्रह वृश्चिक राशीत वक्री होत आहे. सूर्य, हर्षल युती होत आहे. प्रत्येक दिवस तुमच्या कार्याला गतिमान करणारा असेल. प्रयत्न करा. उत्साहवर्धक वातावरण संसारात राहील. धंद्यात मोठे कंत्राट मिळेल. थकबाकी वसूल करता येईल. नवीन ओळखीचा फायदा होईल. होळीच्या सणाला मौज मजा कराल. धूलिवंदनाच्या दिवशी कोणतेही व्यसन करू नका. राजकीय-सामाजिक कार्यात महत्त्वाची भूमिका निभावाल. कला-क्रीडा क्षेत्रात विशेष कौतुक, पुरस्कार, लाभ मिळेल. कोर्ट केस संपवा. संशोधनाच्या कामात प्रगती होईल. नोकरी मिळेल. परदेशात जाण्याचा योग येईल. विद्यार्थी वर्गाला मनाप्रमाणे पुढे जाता येईल. शुभ दि. २८, ३०

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -