घरताज्या घडामोडीसावरकरांची बदनामी करण्याची मोहीम काँग्रेसने उघडली - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सावरकरांची बदनामी करण्याची मोहीम काँग्रेसने उघडली – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Subscribe

'काही लोक जाणीवपूर्वक स्वातंत्र्यवीर सावरकरांची नाहक बदनामी वारंवार करत आहेत. तसेच, काँग्रेसने जणू काही सावरकरांच्या बदनामीची मोहीमच उघडली आहे', अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.

‘काही लोक जाणीवपूर्वक स्वातंत्र्यवीर सावरकरांची नाहक बदनामी वारंवार करत आहेत. तसेच, काँग्रेसने जणू काही सावरकरांच्या बदनामीची मोहीमच उघडली आहे’, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर आधारित असलेल्या ‘वीर सावरकरकर फाळणी रोखण्याची क्षमता असणारा महापुरुष’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. (Congress launched a campaign to defame Savarkar Says CM Eknath Shinde)

दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात सावरकरांवर आधारित असलेल्या डॉ. उदय निरगुडकर यांच्या ‘वीर सावरकरकर फाळणी रोखण्याची क्षमता असणारा महापुरुष’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांना संबोधित केले. त्यावेळी त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधाल.

- Advertisement -

“स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल किती बोललो तरी, ते कमीच आहे. कारण त्यांची देशभक्ती, राष्ट्रभक्ती, त्यांचं बलिदान, त्यांचा त्याग हे आपण कुठल्याही शब्दांमध्ये सांगू शकत नाही. त्यांचं वर्णन शब्दाच्या पलीकडचा आहे. त्यामुळेच काही लोक जाणीवपूर्वक स्वातंत्र्यवीर सावरकरांची नाहक बदनामी वारंवार करत आहेत. काँग्रेसने जणू काही बदनामीची मोहीमच उघडली आहे. संधी मिळेल तिथे या देशभक्ताचा आणि राष्ट्रभक्ताचा अपमान करण्याचे पाप करत आहेत”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

“राम मंदिर आणि 370 कलमाचा देखील उल्लेख या ठिकाणी झाला. सगळ्यांना माहीत आहे की बाळासाहेबांनी देखील एकदा म्हटलं होतं की, मला एक दिवस या देशाचा प्रधानमंत्री करा मी या काश्मीर मधला 370 किलोमीटर होतो. या देशात राम मंदिर आयोजित राम मंदिर राम मंदिर आज या देशाचे पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली राम मंदिराचे काम युद्ध पातळीवर काम सुरू आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या नेतृत्वाखाली एक अभिमान वाटावा अशा प्रकारचं काम या देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी 370 कलम हटवून दाखवलं. मग लोकशाही धोक्यात आहे असे म्हणणारे आणि परदेशामध्ये जाऊन आपल्या देशाचे बदनामी करणाऱ्यांनी कश्मीर येथील लाल चौकात तिरंगा फडकवला. परंतु, 370 कलम हटवलं नसतं तर तिरंगा फडकवण्याची हिंमत तरी दाखवली असती का याचा देखील विचार करण्याची आवश्यकता आहे”, असा टोलाही यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी काँग्रेसला लगावला.

- Advertisement -

“हे पुस्तक आपल्यासमोर आले आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने हे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी पुढाकार घेतला. काही माणसे इतिहास घडवतात आणि काही माणसे इतिहास पळवतात. काँग्रेसने नागरिकांना इतिहासाची केवळ एकच बाजू दाखवली. परंतु 2014 साली या देशांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर हिंदुत्वाचा देखील जागरण सुरू झालं. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनीदेखील ‘गर्व से कौन हिंदू है’ हा नारा देण्याचे धाडस केले होते”, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.


हेही वाचा – संजय राठोड यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करा, नाना पटोलेंची मागणी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -