घरताज्या घडामोडीसत्य कटू असल्याने देशभक्तीला सुपारी म्हणतायत, काँग्रेसचा मोदींवर पलटवार

सत्य कटू असल्याने देशभक्तीला सुपारी म्हणतायत, काँग्रेसचा मोदींवर पलटवार

Subscribe

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेससह विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. काही लोकांनी मला मारण्यासाठी वेगवेगळ्या लोकांना सुपारी दिली आहे, असं वक्तव्य नरेंद्र मोदींनी केलं आहे. राणी कमलापती रेल्वे स्टेशन ते हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशन दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला मोदींनी शनिवारी हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर त्यांनी येथील लोकांना संबोधित केलं. यावेळी संबोधित करताना त्यांनी मला मारण्यासाठी काही लोकांनी सुपारी दिल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, त्यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करत मोदींवर पलटवार केला आहे.

काय म्हणाले सचिन सावंत?

- Advertisement -

सुपारी? धार्मिक द्वेष पसरविण्याविरुध्द, संविधानिक संस्थांवरील दबावाविरुध्द, ED-CBIच्या गैरवापराविरोधात,एकाधिकारशाही विरोधात, अदानी मैत्री विरोधात, प्रचंड महागाई व बेरोजगारी विरोधात,लोकशाही वाचवण्यासाठी बोलणे देशभक्ती आहे.. देशभक्ती! सत्य कटू असल्याने देशभक्तीला सुपारी म्हणत आहेत, असं ट्विट सचिन सावंत यांनी केलं आहे.

- Advertisement -

काय म्हणाले नरेंद्र मोदी?

आपल्या देशात असे काही लोक आहेत. ज्यांनी २०१४ पासूनच निश्चय केला आहे. ते जाहीरपणे बोलले आहेत. त्यांनी संकल्प केला आहे की, ते मोदींची छवी खराब करूनच राहतील. यासाठी या लोकांनी वेगवेगळ्या लोकांना सुपारी देऊन ठेवली आहे आणि स्वत:ही मोर्चा सांभाळत आहेत. या लोकांना साथ देण्यासाठी काही लोक देशात आहेत. तर काही देशाबाहेर आहेत, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

हे लोक सातत्याने मोदींची छबी खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, भारतातील गरीब, मध्यम वर्ग, आदिवासी, दलित, आदींसह प्रत्येक भारतीय आज मोदींची सुरक्षा कवच बनले आहेत. यामुळेच हे लोक अधिक बिथरले आहेत आणि नवनवीन युक्त्या लढवत असतात, असंही मोदी म्हणाले.


हेही वाचा : विरोधी पक्ष दगड-धोंडे नाहीत; सुभाष देसाईंचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -