घरताज्या घडामोडीट्विटर अकाउंट वाचवू न शकणारे देशाच्या सीमेचं कस रक्षण करणार, सचिन सावंतांचा...

ट्विटर अकाउंट वाचवू न शकणारे देशाच्या सीमेचं कस रक्षण करणार, सचिन सावंतांचा भाजपवर निशाणा

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली होती. हॅक झाल्याच्या काही वेळाने ट्विटर अकाऊंट सुरळीत कऱण्यात आले पंरतु यावरुन क्रिप्टोकरन्सीला मान्यता देण्याबाबत ट्वीट करण्यात आले होते. देशाच्या पंतप्रधानांचे ट्विटर अकाऊंट हॅक झाल्यामुळे विरोधकांनी चांगलाच निशाणा साधला आहे. जे स्वतःचे ट्विटर अकाऊंट वाचवू शकले नाही ते देशाच्या सीमा कशा सुरक्षित ठेवणार असा खोचक सवाल काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी भाजपला केला आहे. सचिन सावंत यांनी ट्वीट करत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्विट करत भाजपला चांगलाच टोला लगावला आहे. “चौकीदार अपना ट्विटर अकाउंट नहीं बचा सकता वह देश की सीमा कैसे बचा सकता हैं? और भक्त कहते हैं भारत इनके हाथ में सुरक्षित है।” अशा आशयाचे ट्विट सचिन सावंत यांनी केलं आहे. पंतप्रधान आपले ट्विट अकाऊंट वाचवू शकले नाही ते देशाच्या सीमा कशा सुरक्षित ठेवतील? आणि भक्त म्हणतात देश मोदींच्या नतृत्तावत सुरक्षित आहे असे सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

मोदींचे ट्विटर अकाऊंट हॅक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे @narendramodi ट्विटर अकाऊंट हॅक झाले होते. पंतप्रधान कार्यालयाकडून मोदींचे अकाऊंट हॅक झाली असल्याची माहिती देण्यात आली होती. याची माहिती ट्विटरला दिल्यावर हे अकाऊंट सुरळीत करण्यात आले आहे. दरम्यान त्यावरुन करण्यात आलेल्या ट्वीटवर दुर्लक्ष करा असे पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

पंतप्रधान मोदी यांचे ट्विटर अकाऊंट हॅक केल्यानंतर त्यावर भारतामध्ये बीटकॉईनला मान्यता दिली आहे. तसेच भारताने ५०० बीटकॉईन खरेदी केले असून देशातील लोकांना वाटण्यात येणार असल्याचे ट्विट करण्यात आले होते.


हेही वाचा : पंतप्रधान मोदींचे अकाऊंट हॅकिंगनंतर ट्विटरने दिले स्पष्टीकरण


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -