घरताज्या घडामोडीPM Modi Twitter Account Hack: पंतप्रधान मोदींचे अकाऊंट हॅकिंगनंतर ट्विटरने दिले...

PM Modi Twitter Account Hack: पंतप्रधान मोदींचे अकाऊंट हॅकिंगनंतर ट्विटरने दिले स्पष्टीकरण

Subscribe

रविवारी रात्री ३ वाजून १८ मिनिटांनी पंतप्रधान मोदींच्या अधिकृत ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याची माहिती मायक्रोब्लॉगिंग साइटला देण्यात आली

शनिवार आणि रविवारच्या मध्यरात्री देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आले होते आणि याचदरम्यान अकाऊंटवरुन बिटकॉइन संदर्भातील एक ट्विट देखील करण्यात आले ज्यात भारताने बिटकॉइनला परवानगी दिली असून देशातील लोकांना बिटकॉइन वाटण्यात येईल असे सांगण्यात आले होते. पंतप्रधनांचे अकाऊंट हॅक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्वरित अकाऊंट सुरक्षित आणि संपूर्ण रिस्टोर करण्यात आले. मोदींचे अकाऊंट हॅक झाल्यानंतर ट्विटरने स्पष्टीकरण दिले आहे. ‘पंतप्रधानांचे ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याची माहिती मिळताच आमच्या संपूर्ण टीमने त्वरित अकाऊंट सुरक्षित केले आणि संपूर्ण अकाऊंट रिस्टोर केल्याचे’, ट्विटरने म्हटले आहे.

ट्विटरच्या प्रवक्त्यांनी पुढे असे म्हटले आहे की, ‘पंतप्रधान कार्यालयाशी बोलण्यासाठी आमच्या सेवा २४ तास सुरू आहेत. आम्हाला जेव्हा ही माहिती मिळाली तेव्हा पंतप्रधानांचे अकाऊंट सुरक्षित करण्यासाठी आमची संपूर्ण टीम काम करत होती. ट्विटरच्या आंतरिक तपासणीतून असे समोर आले आहे की पंतप्रधान मोदींचे ट्विटर अकाऊंट हॅक करण्यामागे ट्विटरच्या कोणत्याही सिस्टीमचे उल्लंघन झालेले नाही’.

- Advertisement -

मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इनफॉरमेशन टेक्नोलॉजीची इंडियन कॉम्प्युटर रिस्पॉन्स टीम पंतप्रधानांचे अकाऊंट हॅक कसे झाले याचा शोध घेत आहे. रविवारी रात्री ३ वाजून १८ मिनिटांनी पंतप्रधान मोदींच्या अधिकृत ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याची माहिती मायक्रोब्लॉगिंग साइटला देण्यात आली. त्यानंतर काही वेळातच मोदींचे ट्विटर अकाऊंट रिस्टोर करण्यात आले. अकाऊंट हॅक झाल्यानंतर करण्यात आलेले ट्विट देखील डिलीट करण्यात आले. मात्र त्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू असल्याचे पहायला मिळत आहे.


हेही वाचा – PM Modi Twitter Account Hack: पंतप्रधान मोदींचे ट्विटर अकाऊंट हॅक! बिटकॉइनबाबत केलेले ट्विट चर्चेत

- Advertisement -

 

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -