घरमहाराष्ट्रकिरीट सोमय्यांवर सुमोटोअंतर्गत कारवाई करावी, यशोमती ठाकूरांची मागणी

किरीट सोमय्यांवर सुमोटोअंतर्गत कारवाई करावी, यशोमती ठाकूरांची मागणी

Subscribe

ज्या वृत्तवाहिनींने किरीट सोमय्यांचाय पर्दाफाश केला. त्या पत्रकरांना आणि वृत्तवाहिन्यांला संरक्षण देणार का ? यशोमती ठाकूर यांचा राज्य सरकारला सवाल केला आहे

मुंबई | किरीट सोमय्यांवर सूमोटोअंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी राज्य सरकारकडे केली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामुळे राज्याच्या राजकारण एकच खळबळ उडाली. या व्हिडिओवरून किरीट सोमय्यांवर सर्व सत्तरातून टीकेची झोड उठली आहे. या प्रकरणाची पडसाद पावसाळी अधिवेशनात देखील पडले आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

यशोमती ठाकूर म्हणाल्या, “महिलांना सूमोटो अंतर्गत संरक्षण देणार आहात की नाही?, असा सवाल राज्य सरकारला केला आहे. पुढे त्या म्हणाल्या, “ज्या वृत्तवाहिनींने किरीट सोमय्यांचाय पर्दाफाश केला. त्या पत्रकरांना आणि वृत्तवाहिन्यांला संरक्षण देणार का ? की, बीबीसीवर जशी अरेरावी केली. तशी धाड टाकून जो मुळ मुद्दला बगल देणार का? महिलांना ब्लॅकमेल करण्याचा मुद्दा सरकार लवून टाकणार आहे का? आता करी गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणावर कडक कारवाई करण्याची गरज आहे आणि ते कारवाई करणार आहे की नाही करणार?, असा सवाल केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – चौकशीला सामोरे जाण्याची तयारी, कथित क्लिपप्रकरणी सोमय्यांचे फडणवीसांना पत्र

महिलांना सरकार संरक्षण देणार का?

महिला तक्रार करत नाही, पत्रकारांच्या प्रश्नावर यशोमती ठाकूर म्हणाल्या, महिलांच्या तक्रारीची गरज नाही, सरकार सूमोटो अंतर्गत कारवाई करू शकत नाही का? सरकारला हे दिसत नाही का? महिलांचे संरक्षण करणे हे सरकारचे काम नाही का? कोणती महिला घाबरत असेल किंवा ज्या महिला तक्रार करतील, त्यांना सरकार संरक्षण देणार का? हा विषय खूप गंभीर आहे. यावर गंभीर्याने कारवाई झाली पाहिजे.

- Advertisement -

हेही वाचा – ‘विधानसभेत संधी मिळाली, तर सर्व पुरावे मांडू’, अंबादास दानवेंचा किरीट सोमय्यांना इशारा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -