घरक्राइमठाण्यात कंटेनर आणि जीपचा भीषण अपघात; 6 ठार, 3 जखमी

ठाण्यात कंटेनर आणि जीपचा भीषण अपघात; 6 ठार, 3 जखमी

Subscribe

ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावरील पडघा-खडावली फाट्याजवळ कंटेनर आणि काळी-पिवळी जीपच्या झालेल्या अपघातात सहा जण ठार आणि अन्य तीन जण जखमी झाले. ही घटना आज, मंगळवारी सकाळी साडेसहाच्या सुमारस घडली. ही जीप पडघावरून खडावली रेल्वेस्थानकवार जात होती. त्यात विद्यार्थी देखील होते.

काळी पिवळी जीप (MH04E 1771) मंगळवारी सकाळी पडघा येथून खडावली रेल्वेस्टेशनला जात असताना खडावली फाट्याजवळ ती वळण घेत होती. त्यावेळी मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने एक कंटेनर (MH48 T 7532) आला आणि त्याने या जीपला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की, ती जीप जवळपास 60 फूट फरफटत गेली आणि जीपचा चक्काचूर झाला. या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. तर, अन्य तीनजण जखमी झाले. हा अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

- Advertisement -

चिन्मयी विकास शिंदे (15), रिया किशोर परदेशी, चैताली सुशांत पिंपळे (27), संतोष अनंत जाधव (50), वसंत धर्मा जाधव (50), आणि प्रज्वल शंकर फिरके अशी मृतांची नावे आहेत. तर, दिलीप कुमार विश्वकर्मा (29), चेतना गणेश जसे (19) आणि कुणाल ज्ञानेश्वर भामरे (22) हे तिघे जखमी झाले असून त्यांना भिवंडीच्या मायरा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

ठाण्यात पाच दिवसांत कंटेनरचा दुसरा अपघात
ठाण्यामध्ये अपघाताचे सत्र सुरूच असून पाच दिवसांत कंटेनरचा हा दुसरा अपघात आहे. घोडबंदर रोडवरील पातलीपाडा, होरायझन प्राइम हॉस्पिटलसमोर शनिवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगात असलेल्या कंटेनरने पुढे असलेल्या दुसऱ्या कंटेनरला मागून जोरात धडक दिली होती. या अपघातात धडक देणाऱ्या कंटेनरचा चालक मज्जिद खान (40) याचा मृत्यू झाला होता. या अपघाताने घोडबंदर रोडने ठाण्याच्या दिशेकडे येणाऱ्या वाहतुकीला तब्बल दोन तासांसाठी ब्रेक लागला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -