घरमहाराष्ट्रPratibha Dhanorkar : प्रतिभा धानोरकरांचे 'ते' गंभीर आरोप काँग्रेसने फेटाळले

Pratibha Dhanorkar : प्रतिभा धानोरकरांचे ‘ते’ गंभीर आरोप काँग्रेसने फेटाळले

Subscribe

मुंबई : लोकसभेत काँग्रेसकडून महाराष्ट्रातील प्रश्नांची बाजू मांडणारे खासदार बाळू धानोरकर यांचे 30 मे 2023 रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. मात्र पक्षातंर्गत विरोधामुळे माझ्या नवऱ्याचा जीव गेला आहे, असा गंभीर आरोप दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांनी दोन दिवसांपूर्वीच केला. त्यांच्या आरोपानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. अशातच आमदार धानोरकर यांच्यासारख्या जबाबदार लोकप्रतिनिधींनी असे बेछुट वक्तव्य करणे म्हणजे पक्षाची प्रतिमा मलिन करण्यासारखे असल्याचे स्थानिक नेत्यांनी म्हटले आहे. (Congress rejects Pratibha Dhanorkars those serious allegations)

हेही वाचा – Politics : लोकसभा निवडणुकीपासून भाजपाच्या ‘या’ मंत्र्याने काढला पळ; मला यातून वाचवा, मुख्यमंत्र्यांना घातली गळ

- Advertisement -

स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे की, प्रत्येकाला लोकसभेची उमेदवारी मागण्याचा हक्क आहे. परंतु काँग्रेसच्या उमेदवारीवर केवळ माझाच हक्क आहे असे कुणी म्हणणे योग्य नाही. पाच वर्षांपूर्वी काँग्रेस पक्षात आलेल्या धानोरकर यांना काँग्रेसच्या निष्ठावंतांना हे सांगायची गरज नाही. दिवंगत बाळू धानोरकर यांचा मृत्यू कशामुळे झाला हे सर्वश्रृत आहे. प्रतिभा धानोरकर यांच्या बेछूट आरोपांनी काँग्रेस कार्यकर्ता दु:खावला आहे. त्यामुळे काँग्रेसने सर्वसमावेशक उमेदवार दिला तरच लोकसभा जिंकता येईल, असे स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिकीट आपल्यालाच मिळावे, यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यात शितयुद्ध सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. विजय वडेट्टीवार यांनी त्यांची मुलगी तथा प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार हिच्या उमेदवारीसाठी शिष्टमंडळ दिल्लीला पाठविले होते. त्यानंतर काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद अधिक प्रकर्षाने समोर आला आणि प्रतिभा धानोरकर यांनी काँग्रेस पक्षातील नेत्यांवर आरोप करत निशाणा साधला होता.

- Advertisement -

हेही वाचा – Ramdas Kadam : भाजपा सगळ्या मित्रांना सोबत घेऊन पुढे जाणारा पक्ष; रामदास कदमांचा सूर बदलला

प्रतिभा धानोरकर यांचे गंभीर आरोप

दरम्यान, प्रतिभा धानोरकर दोन दिवसांपूर्वीच म्हणाल्या होत्या की, काँग्रेस पक्षातले काही लोक सातत्याने माझा विरोध करत आहेत आणि याच विरोधामुळे माझ्या नवऱ्याचा जीव गेला आहे. कारण आमच्या पक्षात भाजपाच्या पेरोलवर चालणारे काही लोक आहेत. भाजपवाले जी ऑर्डर देतात ती ते फॉलो करतात. प्रतिभा धानोरकर यांचा रोख कोणाकडे होता, हे स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र त्यावेळी त्यांनी असेही स्पष्ट केले की, चंद्रपूर लोकसभेवर कोणीही दावेदारी केली तरी पहिला हक्क माझा आहे. मी नुकतीच काँग्रेस पक्षाचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांची भेट घेऊन आपली इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी माझे सगळं ऐकून घेतले असून ते या संदर्भात सकारात्मक असल्याचेही म्हटले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -