घरमहाराष्ट्रनाराज काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांचा अखेर शिवसेनेत प्रवेश

नाराज काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांचा अखेर शिवसेनेत प्रवेश

Subscribe

सिल्लोद मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आज मातोश्रीवर जाऊन शिवसेनेत प्रवेश केला आहे. लोकसभा निवडणुकीपासून अब्दुल सत्तार हे काँग्रेसपासून दुरावलेले होते. सत्तार हे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जवळचे सहकारी म्हणून परिचित आहेत. लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी दोन-तीन वेळा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यामुळे ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शविल्यामुळे त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होऊ शकला नाही. अखेर त्यांनी शिवबंधन हाती घेत काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे.

अब्दुल सत्तार यांना औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची होती. मात्र काँग्रेस पक्षाने विधानपरिषदेचे आमदार सुभाष झांबड यांना उमेदवारी दिली होती. तेव्हापासून सत्तार पक्षापासून दुरावलेले होते. सत्तार यांचा सिल्लोड हा विधानसभा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघात येतो. लोकसभा निवडणुकीत सिल्लोडमधून भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे यांना चांगले मताधिक्य मिळाले होते. हे मताधिक्य मिळवून देण्यात सत्तार यांचा हात असल्याची चर्चा होती. मात्र तरिही स्थानिक भाजप कार्यकर्त्यांच्या विरोधासमोर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे चालले नाही आणि सत्तार यांच्या भाजपप्रवेशाचे दरवाजे बंद झाले.

- Advertisement -

शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर सिल्लोड मतदारसंघाची जबाबदारी सोपवली आहे. या मतदारसंघातून त्यांना उमेदवारी मिळणार असल्याचमुळेच त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे बोलले जात आहे.

अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघाबाबत माहिती जाणून घ्या

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -