घरमहाराष्ट्रनागपूरमध्ये काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा

नागपूरमध्ये काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा

Subscribe

काँग्रेस पक्षाची राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा येत्या १० जानेवारी पासून नागपूर विभागात सुरु होणार आहे.

महाराष्ट्रातील जनतेच्या अनेक प्रलंबित मागण्यांसाठी काँग्रेस पक्षाने राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा काढण्याचे हाती घेतले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाची राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा गुरुवारपासून नागपूर विभागात सुरु होणार आहे. जनसंघर्ष यात्रेचा हा पाचवा टप्पा असून यापूर्वी पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि अमरावती विभागाचे चार टप्पे जनतेच्या प्रचंड प्रतिसादासह पूर्ण झाले आहेत. यावेळचा हा पाचवा टप्पा असून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातारण निर्माण झाले आहे.

अशी पार पडणार जनसंघर्ष यात्रा

दिक्षाभूमी, नागपूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून जनसंघर्ष यात्रेच्या पाचव्या टप्पाला सुरुवात होणार आहे. ही संघर्घ यात्रा १० जानेवारी रोजी सकाळी १०.०० वाजता सुरु होणार आहे. त्यानंतर ताजबाग आणि गणेश टेकडी येथे दर्शन घेऊन जनसंघर्ष यात्रेचा नागपूर विभागातील प्रवास सुरु होईल. तर दुपारी १२ वाजता कामठी येथे जनसंघर्ष यात्रेचे भव्य स्वागत होणार असून दुपारी २.३० वाजता रामटेक येथे पहिली जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ५.०० वाजता तुमसर जिल्हा भंडारा येथे यात्रेचे भव्य स्वागत होणार आहे. तर सायंकाळी ६ वाजता तिरोडा येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

- Advertisement -

या यात्रेमध्ये विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, ज्येष्ठ नेते आणि विधानपरिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री नसीम खान यांच्यासह राज्यातील सर्व प्रमुख नेते, काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. केंद्रातील आणि राज्यातील नाकर्त्या भाजप शिवसेना सरकारविरोधात जनतेच्या हक्कासाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी काँग्रेस पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले आहे.

सभेचे आयोजन

शुक्रवार ११ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता गोंदिया याठिकाणी तर दुपारी २ वाजता सडक अर्जुनी सभा घेतली जाणार आहे. तर सायंकाळी ४ वाजता साकोली जिल्हा भंडारा येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

- Advertisement -

शनिवार १२ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता भंडारा, दुपारी २.१५ वाजता चिमूर जिल्हा चंद्रपूर येथे जाहीर सभा होणार आहेत. तर सायंकाळी ५ वाजता वरोरा येथे जनसंघर्ष यात्रेचे स्वागत होणार असून सायंकाळी ६ वाजता चंद्रपूर येथे रॅली काढण्यात येणार आहे.

रविवार १३ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता गडचिरोली, दुपारी २ वाजता ब्रम्हपुरी येथे जाहीर सभा होणार असून जनसंघर्ष यात्रेच्या पाचव्या टप्प्याची सांगता सभा सायंकाळी ६ वाजता नागपूर येथे होणार आहे.


वाचा – जनतेच्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -