घरमहाराष्ट्रजनतेच्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा

जनतेच्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा

Subscribe

महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार यामुळे राज्यातील जनता त्रस्त झाली असून महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय मात्र सरकार काहीच उपाययोजना करत नाही. त्यामुळे जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी काँग्रेस पक्षाने राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा काढण्याचे हाती घेतले आहे. या यात्रेला यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथून सुरुवात होणार आहे.

गेल्या साडेचार वर्षात केंद्रातील आणि राज्यातील भाजप – शिवसेना सरकारने जनतेला दिलेले एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. देशात अग्रेसर असणाऱ्या महाराष्ट्राची गेल्या चार वर्षात मोठी पिछेहाट झाली आहे. राज्यात १७ हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.  शेतीमालाला भाव नाही.  महिलांवरील अत्याचाराच मोठी वाढ झाली आहे. तसेच महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार यामुळे राज्यातील जनता त्रस्त आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय मात्र सरकार काहीच उपाययोजना करत नाही. त्यामुळे जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्यांच्या हक्कांसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी काँग्रेस पक्षाने राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा काढली आहे. या यात्रेच्या चौथ्या टप्प्याची सुरुवात ४ डिसेंबर रोजी यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथून होणार आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथून जनसंघर्ष यात्रेचा प्रारंभ

महाराष्ट्रातील जनतेच्या अनेक प्रलंबित मागण्यांसाठी काँग्रेस पक्षाने राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा काढण्याचे हाती घेतले आहे. या जनसंघर्ष यात्रेचा प्रारंभ यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथून होणार आहे. या यात्रा पश्चिम विदर्भातील  यवतमाळ, वाशिम, अकोला, अमरावती, बुलढाणा या जिल्ह्यांतून प्रवास सुरु होणार असून ९ डिसेंबर रोजी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे विराट जाहीर सभेने या यात्रेचा समारोप होणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

- Advertisement -

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, विधान सभेतील काँग्रेस पक्षाचे उपनेते विजय वडेट्टीवार, महिला काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षा चारूलता टोकस, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्यासह राज्यातील काँग्रेस पक्षाचे सर्व प्रमुख नेते आणि प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी या यात्रेत सहभागी होणार आहेत.

जनसंघर्ष यात्रेच्या चौथ्या टप्प्याचा कार्यक्रम

  • ४ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथील श्री चिंतामणी गणपतीचे दर्शन घेवून यात्रेचा प्रारंभ होणार आहे. त्यानंतर सकाळी ११.३० ते १.३० वाजता यतवमाळ येथे जाहीर सभा होणार असून सायंकाळी ४.३० ते ६ वाजता धामणगांव येथे जाहीर सभा होणार. त्यानंतर सायंकाळी ७ ते ८.३० वाजता आर्वी येथे जाहीर सभा होणार आहे.
  • ५ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० ते १२ वाजेपर्यंत मोर्शी येथे जाहीर सभा, दुपारी २ ते ३.३० वा.  चांदूर बाजार येथे जाहीर सभा, सायं. ४.३० ते ६ वा. वळगांव येथे जाहीर सभा, सायं. ६.३० ते ९.३० वा. अमरावती येथे जाहीर सभा होणार आहे.
  • ६ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० ते १२ वा. दर्यापूर येथे जाहीर सभा, दुपारी १.३० ते १.४५ वा. मुर्तिजापूर येथे स्वागत, दुपारी २.३० ते ४ वा. कारंजा येथे जाहीर सभा, सायं. ५ ते ७ वा. वाशिम येथे जाहीर सभा होणार आहे.
  • ७ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० ते १२ वा. रिसोड येथे जाहीर सभा, दुपारी ३ ते ५ वा. अकोला येथे जाहीर सभा, सायं. ६ ते ८ वा. बाळापूर येथे जाहीर सभा, रात्री ८.३० ते १० वा. शेगांव येथे दर्शन.
  • ८ डिसेंबर रोजी दुपारी ११ ते १२.३० वा. अकोट येथे जाहीर सभा, दु. ३ ते ४.३० वरवट बकाल येथे जाहीर सभा, सायं. ६ ते ८ वा. खामगांव येथे जाहीर सभा होणार आहे.
  • ९ डिसेंबर रोजी दुपारी १२ ते २ वा. चिखली येथे अमरावती विभाग जनसंघर्ष यात्रेचा सांगता समारोप होईल.

वाचा – काँग्रेसचा जनसंघर्षाचा दुसरा टप्पा

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -