घरताज्या घडामोडीमाझे राजकीय करियर संपवण्याचा कट; खासदार राहुल शेवाळे यांचा ठाकरे गट, राष्ट्रवादीवर...

माझे राजकीय करियर संपवण्याचा कट; खासदार राहुल शेवाळे यांचा ठाकरे गट, राष्ट्रवादीवर आरोप

Subscribe

ठाकरे गटाच्या आमदार मनिषा कायंदे यांनी विधान परिषदेत केलेल्या मागणीनुसार उपसभापती नीलम गोर्‍हे यांनी शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्यावर एका महिलेने बलात्कार आणि मारहाणप्रकरणी केलेल्या आरोपांच्या अनुषंगाने विशेष तपास पथका (एसआयटी) मार्फत चौकशीचे आदेश दिले आहेत. यामुळे राहुल शेवाळे चांगलेच अडचणीत आले आहेत.

मुंबई : ठाकरे गटाच्या आमदार मनिषा कायंदे यांनी विधान परिषदेत केलेल्या मागणीनुसार उपसभापती नीलम गोर्‍हे यांनी शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्यावर एका महिलेने बलात्कार आणि मारहाणप्रकरणी केलेल्या आरोपांच्या अनुषंगाने विशेष तपास पथका (एसआयटी) मार्फत चौकशीचे आदेश दिले आहेत. यामुळे राहुल शेवाळे चांगलेच अडचणीत आले आहेत. आपली बाजू मांडण्यासाठी शेवाळे यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन बलात्काराचे आरोप करणार्‍या महिलेचे दाऊद गँगशी संबंध असल्याचा दावा केला आहे. शिवसेना सोडून गेल्यावर हे प्रकरण उचलण्यात आले. देशातील 5 ते 6 ठिकाणचे पोलीस ज्या महिलेला शोधत आहे, त्या महिलेला राष्ट्रवादीची प्रवक्ता टीव्हीवर घेऊन येते. यामागे युवासेनेच्या प्रमुखांची फूस आहे. ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस आपले राजकीय करियर संपवण्याचा कट रचत असल्याचा आरोपदेखील खासदार राहुल शेवाळे यांनी केला आहे. (Conspiracy to end my political career MP Rahul Shewale accused Thackeray group NCP)

पत्रकार परिषदेत बोलताना राहुल शेवाळे म्हणाले की, मी लोकसभेत अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात एयू असे नाव घेतल्यामुळे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादीने जाणीवपूर्वक माझे वैयक्तिक आयुष्य आणि राजकीय करिअर संपवण्यासाठी कटकारस्थान रचले आहे. दाऊद गँगशी संबंधित असलेल्या महिलेचे नाव माझ्यासोबत जोडण्यात आले आहे. माझ्यावर आरोप करणारी महिला दिल्लीत डान्स बारमध्ये काम करते. तिची कौटुंबिक पार्श्वभूमीदेखील गुन्हेगारी प्रवृत्तीची आहे. संबंधित महिलेला कोविड काळात आर्थिक मदतीची गरज होती. माझा दुबईतील मित्र रेहमान याच्या सांगण्यावरून मी तिला मदत केली. कालांतराने तिच्या अपेक्षा वाढत गेल्या. मी जेव्हा पैसे देण्याचे थांबवल्यावर तिने माझे खोटे फोटो, व्हिडीओ व्हायरल केले. ती मला आणि माझ्या पत्नीला पैशांसाठी ब्लॅकमेल करू लागली, असा दावा राहुल शेवाळे यांनी केला.

- Advertisement -

सप्टेंबर २०२१ मध्ये तिच्या भावाने दिल्लीत खून केला. या हत्येप्रकरणी नाव येताच संबंधित महिला दिल्लीहून दुबईला पळून गेली. दुबईला गेल्यावर या महिलेने सोशल मीडियावर फेक अकाऊंट तयार करून दाऊद टोळीच्या मदतीने ब्लॅकमेलिंग करण्यास सुरुवात केली. माझ्या पत्नीलाही धमक्या दिल्या. त्यामुळे आम्ही तिच्याविरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सायबर गुन्ह्यांतर्गत एफआयआर दाखल झाला. दुबई पोलिसांच्याही ही गोष्ट लक्षात आणून दिल्यावर, दुबई पोलिसांनी तिला एका प्रकऱणात अटक केली. या प्रकरणात ती ८६ दिवस तुरुंगात होती. त्यानंतर शारजाह कोर्टाने तिची दुबईतून हकालपट्टी केली, अशी माहिती राहुल शेवाळे यांनी दिली.

पुन्हा एप्रिलमध्ये या महिलेच्या कारवाया सुरू झाल्या. माझ्या पत्नीचे फेक अकाऊंट बनवून धमकावू लागली. आम्ही तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट तपासले असता त्या अकाऊंटला युवासेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते फॉलो करत असल्याचे दिसले. युवासेनेचे अनेक पदाधिकारी या महिलेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. मी ज्या पक्षात होतो त्याच पक्षातील लोकच त्या महिलेशी संपर्क साधत होते आणि माझ्याविरोधात तक्रार दाखल करण्यास प्रवृत्त करत होते.

- Advertisement -

या महिलेने माझ्याविरोधात साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर मीही या महिलेविरोधात क्रॉस तक्रार केली. माझ्या तक्रारीवर महिन्याभरात कारवाई झाली नाही. त्यामुळे मी अंधेरी कोर्टात धाव घेतली. कोर्टाने माझ्या तक्रारीवर कारवाई सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, साकीनाका पोलिसांनी एफआयआर नोंदवून घेतला, मात्र कारवाई सुरू केली नाही, असा आरोपही शेवाळेंनी केला.

या प्रकरणात कारवाई होऊ नये म्हणून राष्ट्रवादीकडून कटकारस्थान रचले जात होते. माझ्याविरोधात गुन्हा दाखल व्हावा म्हणून वरिष्ठ पोलिसांनाही राष्ट्रवादीकडून आदेश देण्यात आले होते. अंधेरी कोर्टात माझी बाजू मी मांडली. ही ब्लॅकमेलिंगची केस असल्याने यात कारवाई झाली पाहिजे, असे निर्देश कोर्टाने दिले. त्यानुसार, गुन्हा नोंदवत साकीनाका पोलीस सदर महिलेलाल शोधत आहेत, मात्र इमेलद्वारे या महिलेशी संपर्क साधूनही महिला जबाबासाठी येत नाही. माझ्या पत्नीनालाही धमक्या येत असल्याने तिने गोवंडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दिल्लीच्या पत्त्यावर गोवंडी पोलिसांना सदर महिला सापडली नाही, असे शेवाळेंनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -