घरताज्या घडामोडीनागपूरमध्ये सरकारी कार्यालयात मास्क बंधनकारक; प्रशासनाचे आदेश

नागपूरमध्ये सरकारी कार्यालयात मास्क बंधनकारक; प्रशासनाचे आदेश

Subscribe

राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये सध्या हिवाळी अधिवेशन सुरू असताना जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयात मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. कोरोनानंतर 2 वर्षांनी नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन भरले आहे.

नागपूर : राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये सध्या हिवाळी अधिवेशन सुरू असताना जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयात मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. कोरोनानंतर 2 वर्षांनी नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन भरले आहे. अधिवेशननिमित्ताने संपूणं मंत्रिमंडळ, सरकारी अधिकारी, महत्वाचे नेते नागपुरात आहेत. सोबतच विविध संस्था, संघटनांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्तेही नागपुरात ठाण मांडून असल्याने विधिमंडळ परिसरात चांगलीच गर्दी होत आहे. सध्या जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने नागपूर प्रशासन सतर्क झाले आहे. (Masks mandatory in government offices in Nagpur Administration orders)

शासकीय कार्यालयात कामानिमित्त येणार्‍या नागरिकांनीदेखील मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. मास्क संदर्भातल्या काढलेल्या पत्रामध्ये शासकीय व निमशासकीय कार्यालयात मास्क बंधनकारक असेल असा उल्लेख करण्यात आला आहे, मात्र हे विनंती स्वरूपात असल्याचे जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांनी स्पष्ट केले आहे. लवकरच सर्व नागरिकांसाठीही आम्ही असे आदेश काढणार आहोत, अशीही माहिती जिल्हाधिकार्‍यांनी दिली.

- Advertisement -

सद्यस्थितीत कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जगातल्या अनेक देशांमध्ये कोविड १९ ची लाट पसरली आहे. या विषाणूचा शिरकाव भारतात होऊन पुन्हा एकदा कोरोनाच्या चौथ्या लाटेचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि प्रसार रोखण्यासाठी मास्कचा उपयोग हे प्रभावी साधन आहे. त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील आणि ग्रामीण भागातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यलाय, अस्थापन येथील अधिकारी आणि कर्मचारी तसेच भेट देणारे नागरिक यांनी मास्कचा वापर करावा, असे आवाहन पत्रकात करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -