घरमहाराष्ट्रLockdown: राज्यात कोरोनाचा कहर! नांदेडमध्ये ११ दिवसांचा लॉकडाऊन

Lockdown: राज्यात कोरोनाचा कहर! नांदेडमध्ये ११ दिवसांचा लॉकडाऊन

Subscribe

महाराष्ट्रात कोरोनाचा कहर वाढत असून नांदेडमध्ये ४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. आज रात्री १२ वाजेपासून हे निर्बंध लागू केले जाणार आहे. नांदेड जिल्ह्यात २६ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. नांदेडचे जिल्हाधिकारी (डीसी) डॉ. विपिन इटणकर यांनी आज बुधवारी हे आदेश जारी करत जिल्ह्यात ११ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली. यानुसार जिल्हा प्रशासनाने कडक बंद जाहीर केला आहे. हा लॉकडाऊन उद्या गुरुवारपासून सुरू होणार असून पुढील ११ दिवस सुरू राहणार आहे. यादिवसात, होळी हा सण देखील असल्याने या सणावर देखील कोरोनाचे सावट असणार आहेत. नांदेडमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढून १,३३० झाली आहे. आज १० जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. नांदेडच्या आधी बीडमध्ये देखील लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. कोरोनाची वाढती चिंता लक्षात घेता बीडमध्ये २६ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.

काय असणार बंद? वाचा

या १० दिवसांच्या लॉकडाऊन दरम्यान सर्व विवाह कार्यालयं, हॉटेल आणि रेस्टॉरंट्स बंद राहणार आहे. याशिवाय सर्व शाळा, महाविद्यालयेही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यावेळी खासगी कार्यालये बंद ठेवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. कर्मचार्‍यांनाही घरून काम मिळण्याच्या सूचनादेखील देण्यात आल्या आहेत.
दरम्यान दूध, औषध, भाज्या आणि रेशन यासारख्या जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकाने या काळात खुली ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. कोरोनाचा कहर महाराष्ट्रात कायम असून मंगळवारी राज्यात २८ हजारांपेक्षा जास्त नवीन प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. तर १३२ लोक कोरोनाने मरण पावले आहे. राज्यात कोरोनामुळे मृत्यूची संख्या आता ५३ हजार ५८९ वर पोहोचली असल्याची माहिती मिळतेय.

- Advertisement -

बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू

कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत असल्यामुळे बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. २६ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत बीड जिल्ह्यात लॉकडाऊन असणार आहे. या लॉकडाऊन दरम्यान फक्त अत्यावश्यक सोयी-सुविधा राहतील. दूध, भाजीपाला, किराणा दुकान सकाळी ७ ते ९ यावेळेत सुरू असणार आहे. तसेच यादरम्यान संपूर्णपणे वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -