घरमहाराष्ट्रपुण्यातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीत करोना

पुण्यातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीत करोना

Subscribe

जनता वसाहतीत ३ रुग्ण पॉझिटिव्ह

पुण्यात गेल्या ६१ दिवसांपासून सुरक्षित असलेल्या जनता वसाहतीत करोनाने शिरकाव केला आहे.जनता वसाहतीमध्ये तीन करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी दोघांवर रुग्णालयात उपचार सुरु होता. प्रशासनाने तिनही रुग्णांच्या क्लोज कॉन्टॅक्टमधील लोकांचीदेखील चाचणी केली. त्या सर्वांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

महाराष्ट्रातच नव्हे तर देशात झोपडपट्ट्यांमध्ये पसरलेल्या करोनावर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला घाम फुटत आहे. मालेगाव आणि नागपुरातील दाट वस्तीचे परिसर, मुंबईतील धारावी झोपडपट्टी आणि पुण्याच्या दाट वस्ती असलेल्या पेठांमध्येही करोनाचं थैमान सुरु आहे. मात्र, पुण्यातील सर्वात मोठी झोपडपट्टी ठरलेल्या जनता वसाहतीत गेल्या ६१ दिवसांपासून करोना पायदेखील ठेवू शकला नव्हता. नागरिकांनी दाखवलेली शिस्त आणि संयममुळेच ते शक्य झाले.

- Advertisement -

पुण्याच्या पर्वती टेकडीच्या पायथ्याला जनता वसाहत वसली आहे. सुमारे १०० एकर पर्वती टेकडीच्या उतार्‍यावर ही जनता वसाहत वसलेली आहे. जनता वसाहतीची लोकसंख्या ७० हजार इतकी आहे. पुण्यातील पेठा आणि दाट वस्तींचे परिसर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले. मात्र, जनता वसाहतीत एकही करोनाचा रुग्ण आढळला नव्हता. जनता वसाहतीत प्रशासनाने केलेले नियोजन आणि नागरिकांचा मिळालेला प्रतिसाद या दोन गोष्टींमुळे जनता वसाहतीत करोनाचा एकही रुग्ण आढळला नव्हता.

करोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी जनता वसाहतीच्या नागरिकांचेच नियोजन असून, कंटेनमेंट झोन नसूनही दुकाने सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु असतात.वसाहतीच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायझर टनेल उभारण्यात आले आहे. वसाहतीच्या ५ प्रवेशद्वारांपैकी फक्त एकाच प्रवेशद्वाराने प्रवेश दिला जात आहे. पर्वती टेकडीवर जाणारे रस्ते आणि पायवाटाही बंद करण्यात आल्या आहेत. भाजी खदेदीसाठी बाहेर जावे लागू नये म्हणून स्वस्त दरात घरपोच भाजीची सुविधा देण्यात आली आहे. वसाहतीतील जनता रुग्णालयात १५० ते २०० जणांची मोफत तपासणी केली जाते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -