घरमहाराष्ट्रसहा दिवसात कोरोना रुग्ण तिपटीने वाढले!

सहा दिवसात कोरोना रुग्ण तिपटीने वाढले!

Subscribe

मंत्रिमंडळ बैठकीत आरोग्य विभागाची माहिती, लसीकरणाचा वेग वाढविण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना

राज्यात गेल्या सहा दिवसात कोरोना रुग्णांची संख्या तिपटीने वाढल्याची धक्कादायक माहिती सोमवारी सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने राज्य मंत्रिमंडळाला देण्यात आली. जानेवारीच्या मध्यात कोरोनाच्या सक्रिय रुग्णात वाढ होण्याची शक्यताही विभागाने वर्तवली.

८ डिसेंबर रोजी राज्यात कोरोनाचे ६ हजार २०० सक्रिय रुग्ण होते. मात्र, आज १० हजार सक्रिय रुग्ण आहेत. एकूणच गेल्या २० दिवसात सक्रिय रुग्णांत ५० टक्के वाढ झाली असून राज्यात पॉझिटिव्हिटी रेट १.०६ टक्के झाल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली

- Advertisement -

यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचा संसर्ग वाढत असून तो रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग अधिक वाढविण्याची गरज असल्याचे सांगितले. आपल्याला अधिक दक्षता बाळगून काटेकोर पाऊले उचलावी लागणार असून टास्क फोर्सची बैठकही येत्या एक दोन दिवसांत आयोजित करावी, अशी सूचनाही त्यांनी केली.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोनाच्या वाढत्या संसर्गावर चिंता व्यक्त करण्यात आली. यावेळी डॉ. व्यास यांनी आपल्या सादरीकरणात जानेवारीच्या मध्याला कोरोनाच्या सक्रिय रुग्णात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली असून त्यासाठी लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज आहे. काही दिवसांपूर्वी आपण दिवसाला आठ लाख डोसेस देत होतो. सध्या दिवसाला पाच लाख डोस दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्व पालकमंत्र्यांनी पाठपुरावा करून आपापल्या जिल्ह्यांत लसीकरण वेगाने होईल, असे पाहण्याचे निर्देश दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -