घरताज्या घडामोडीcorona Virus : बाळासाहेब थोरात यांना कोरोनाची लागण, संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचे...

corona Virus : बाळासाहेब थोरात यांना कोरोनाची लागण, संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचे आवाहन

Subscribe

महाविकास आघाडीमधल्या मंत्र्यांना आणि आमदारांना कोरोनाची लागण होत आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. यानंतर आता काँग्रेसचे आणखी एक नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती बाळासाहेब थोरात यांनी स्वतः ट्विट करत दिली आहे. तसेच इतरांनाही काळजी घेण्याचे आवाहन बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे. बाळासाहेब थोरात राज्याच्या हिवाळी अधिवेशनात उपस्थित राहिले होते. तसेच अनेक बैठकांनाही उपस्थित होते त्यामुळे आता चिंतेत वाढ झाली आहे.

राज्यात कोरोना व्हायरस आणि ओमिक्रॉन व्हेरिएंट हातपाय पसत आहे. कोरोना रुग्णांची वाढ पुन्हा एकदा झपाट्याने होत आहे. दरम्यान सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी भाजपमधील अनेक नेत्यांना कोरनाची लागण झाली आहे. काँग्रेसचे नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना कोरोनाची लागण झाली आहे.

- Advertisement -

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ट्विट करत कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली आहे. बाळासाहेब थोरात यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. मला कोणतेही लक्षणे नाही, तरीही डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेणार आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. सगळ्यांना या निमित्ताने आवाहन करत आहे, आपण मास्क वापरावा, काळजी घ्यावी.

- Advertisement -

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात काही दिवसांपूर्वी राजकीय कार्यक्रमांमध्ये सामिल झाले होते. तसेच राजकीय नेत्यांच्या मुलांच्या लग्न सोहळ्यालाही उपस्थित होते. यामुळे आधिक चिंता वाढली आहे.


हेही वाचा : Corona Virus: राज्यात कोरोनाचा स्फोट, निर्बंधाबाबत दोन दिवसांत निर्णय घ्यावा लागेल, राजेश टोपेंचा इशारा

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -