Omicron Death Maharashtra: राज्यात ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण दगावला! पिंपरी चिंचवड मधील ओमिक्रॉन बाधित रुग्णांचा मृत्यू

राज्यात २४ तासात एकूण १९८ ऑमिक्रॉन बाधित रुग्णांची नोंद

देशासह राज्यात ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका वाढत असतानाच गुरुवारी देशातील आणि राज्यात ओमिक्रॉन बाधित रुग्णाचा पहिला बळी गेला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये आढळलेल्या५२ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हा रुग्ण नायजेरियामधून पिंपरी चिंचवड येथे आला होता. २८ डिसेंबर रोजी त्याचा ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली होती मात्र या रुग्णाची NIV चाचणीचे सॅम्पल्स पाठवण्यात आले होते. या चाचणीचा अहवाल गुरुवारी प्राप्त झाला असून त्या रुग्णाला कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हायरसची लागण झाल्याचे नमूद करण्यात आले आहे, राज्य आरोग्य विभाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

 

पिंपरी चिंचवडमध्ये ३ ओंमिक्रॉन बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यात दोन स्रिया आणि एका पुरुषाचा समावेश आहे. यातील १ रुग्ण नायजेरीयातून प्रवास करुन आले आहेत. तर २ रुग्ण त्याच्या संपर्कात आल्याने त्यांना ओमिक्रॉनची बाधा झाली आहे. यातीलच एका रुग्णाचा २८ डिसेंबर रोजी मृत्यू झाला त्याचा मृत्यू गैर कोविड कारणांमुळे झाल्याचे सांगण्यात आले मात्र त्याची NIV चाचणी ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आली. त्याच्यासोबत असलेले दोन रुग्ण सध्या भुसावळ येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत.

राज्यात २४ तासात एकूण १९८ ऑमिक्रॉन बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली. यातील १९० रुग्ण हे मुंबईत आढळून आले आहेत. तर ४ रुग्ण हे ठाण्यातील आहे. त्यामुळे राज्यात आतापर्यंत आढळून आलेल्या ऑमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या ही ४५० इतकी झाली आहे. यापैकी १२५ रुग्णांनी ओमिक्रॉनवर मात केली आहे. तसेच राज्यात मागील २४ तासात ५ हजार ३६८ कोरोना बाधितांची नोंद झालीय. तर २२ जणांचा मृत्यू झाला आहे.


हेही वाचा – Mumbai Corona Update: मुंबईतील रुग्णसंख्या वाढली, आज ३,६७१ नव्या रुग्णांची नोंद तर शून्य मृत्यू