घरताज्या घडामोडीCorona Virus: राज्यात कोरोनाचा स्फोट, निर्बंधाबाबत दोन दिवसांत निर्णय घ्यावा लागेल, राजेश...

Corona Virus: राज्यात कोरोनाचा स्फोट, निर्बंधाबाबत दोन दिवसांत निर्णय घ्यावा लागेल, राजेश टोपेंचा इशारा

Subscribe

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा स्फोट होण्याच्या मार्गावर आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये महाराष्ट्रात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. आता महाराष्ट्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या वाटेवर आहे. राज्यात दिवसभरात पाच हजारापेक्षा अधिक रुग्ण आढळल्यामुळे राज्य सरकारची चिंता वाढली आहे. यामुळे राज्यात निर्बंध लावण्याबाबतचा निर्णय आज किंवा उद्या या दोन दिवसांतच घ्यायला पाहिजे असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कोरोना लसीकरण वेगाने करण्यात येत आहे. तसेच १५ ते १८ वर्षांच्या मुलांचे लसीकरणही वेगाने करण्यात येत असल्याचे राजेश टोपे म्हणाले आहेत.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीची माहिती दिली आहे. राज्यात ५ हजार ३६८ रुग्णांची नोंद झाली आहे. तर बुधवारी ३ हजार ९०० रुग्णांची नोंद झाली होती. मुंबईत बुधवारी अडीच हजार रुग्ण सापडले होते तर गुरुवारी ३ हजार ५०० पेक्षा अधिक रुग्ण आढळल्यामुळे कोरोना रुग्णवाढीचा दर दुप्पट झाला आहे. ठाणे, पुणे आणि रायगडमध्येही कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. यामुळे पुन्हा निर्बंध लागू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

- Advertisement -

राज्यातील कोरोना रुग्णवाढीचा दर दुप्पट झाल्यामुळे चिंता वाढली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि टास्क फोर्समध्ये बैठक झाली. या बैठकीत कोरोनावरील उपाययोजना आणि निर्बंधांबाबत चर्चा करण्यात आली आहे. चर्चेतील मुद्द्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्बंध लागू करण्याबाबत निर्णय घेतील. परंतु निर्बंध लागू करण्याबाबतचा निर्णय आज किंवा उद्या घेतला पाहिजे असेही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान कार्यक्रमांना होणारी गर्दी टाळली पाहिजे यावर सगळ्यांचे एकमत झाले आहे. या गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे गर्दीवर निर्बंध आणणं जरुरी असल्याचे राजेश टोपे म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : Mumbai Corona Update: मुंबईतील रुग्णसंख्या वाढली, आज ३,६७१ नव्या रुग्णांची नोंद तर शून्य मृत्यू

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -