पुणे शहरात दिवसभरात १ हजार ५९९ कोरोनाबाधित आढळले असून शहरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ४४ हजार ०६५ इतकी झाली आहे. तर दिवसभरात ३६ जणांचा कोरोनामुळे बळी गेल्याने एकूण १ हजार १०४ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, आज दिवसभरात ७७९ रुग्ण बरे झाले. पुण्यात आतापर्यंत एकूण २५ हजार ९०८ रुग्ण बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आले आहे. पुण्यात कोरोनाचा कहर वाढत असून सध्या १७ हजार ५३ ॲक्टिव्ह रुग्ण असल्याचे सांगितले जात आहे.
- Advertisement -
मिळालेल्या माहितीनुसार, आज ६ हजार ६६३ कोरोना चाचण्या करण्यात आल्या असल्याने पुणे शहरात आतापर्यंत एकूण २ लाख २९ हजार ७०४ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी एकूण ४४ हजार ०६५ व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आल्या आहेत, तर १७ हजार ०५३ अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.