घरताज्या घडामोडीCoronavirus Maharashtra: राज्यात २४ तासांत तब्बल ९८९५ नवे रूग्ण; २९८ मृत्यू

Coronavirus Maharashtra: राज्यात २४ तासांत तब्बल ९८९५ नवे रूग्ण; २९८ मृत्यू

Subscribe

गेल्या २४ तासांत तब्बल ९ हजार ८९५ नव्या रूग्णांची नोंद राज्यात करण्यात आली आहे. तर दिवसभरात २९८ जणांचा कोरोनाने बळी गेला आहे.

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून गेल्या २४ तासांत तब्बल ९ हजार ८९५ नव्या रूग्णांची नोंद राज्यात करण्यात आली आहे. तर दिवसभरात २९८ जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत एकूण ३ लाख ४७ हजार ५०२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच आज दिवसभरात ६ हजार ४८४ कोरोना रूग्णांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण १ लाख ९४ हजार २५३ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५५.९ % एवढे झाले आहे.

तर आज दिवसभरात राज्यात आज २९८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंदकरण्यात आली असून सध्या राज्यातील मृत्यू दर ३.७ % एवढा झाला आहे. तसेच, सध्या राज्यात ८ लाख ७४ हजार २६७ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ४५ हजार २२२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

- Advertisement -

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १७,३७,७१६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३ लाख ४७ हजार ५०२ (२० टक्के) कोरोना नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, राज्यात आज एकूण १ लाख ९४ हजार २५३ Active रुग्ण आहेत.


हेही वाचा – मटणावर ताव मारायला कैदी गेला घरी आणि…

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -