घरक्राइमकर्जाला कंटाळून दाम्पत्याची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये धक्कादायक बाबी

कर्जाला कंटाळून दाम्पत्याची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये धक्कादायक बाबी

Subscribe

इंदिरानगर : कोरोनाकाळात नोकरी गेली. त्यातच कर्जाचे हफ्ते भरणेही मुश्किल झाले. अशातच कर्जदारांनी वसुलीसाठी तगादा लावत असल्याने ताणतणावात आल्याने दांम्पत्याने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना इंदिरानगरमधील नयनतारा गोल्ड या आलिशान सोसायटीत घडली. गौरव जितेंद्र जगताप (वय २९), पत्नी नेहा गौरव जगताप (२३) अशी मृत्यू झालेल्या पती-पत्नीची नावे आहेत.

कोरोनाच्या महामारीने अनेक जण बेरोजगार झाले तर अनेकांना आपला व्यवसाय गुंडाळावा लागला. अडीच वर्षे उलटूनही कोरोनाची धग अजून कायम आहे. अजूनही अनेक परिवार या महामारीच्या संकटातून आलेल्या नुकसानीमुळे उभे राहू शकलेले नाहीत. यातीलच एक जगताप कुटुंब. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनापूर्वी गौरव व नेहाने प्रेमविवाह केला होता. नेहा ही विंचूर गवळी (ता.नाशिक) येथील रहीवासी असून, गौरव नंदूरबार येथील आहे. विवाहानंतर सुखी आयुष्य जगत असताना जगताप दाम्पत्याने इंदिरानगर परिसरातील अनमोल नयनतारा गोल्ड सोसायटीमध्ये फ्लॅट विकत घेतला. गौरव अंबड औद्योगिक वसाहतीतील पीडीलाईट या खासगी कंपनीमध्ये नोकरीला होता. मात्र कोरोनाच्या महामारीत आलेल्या मंदीच्या लाटेत गौरवची नोकरी गेली होती. त्यामुळे जगताप दाम्पत्य गेल्या काही दिवसांपासून आर्थिक विवंचनेत होते.

- Advertisement -

कर्जाचा डोंगर वाढतच गेला, कर्जदारांनी गौरवकडे तगादा लावला होता. त्यातून जगताप दाम्पत्य ताणतणावाखाली आले होते. अखेर कंटाळून गौरव व नेहाने रविवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान गौरवची नाशिक येथील मावशी चित्रा यांनी नेहाशी मोबाईलवर संपर्क साधला. मात्र, संपर्क होत नसल्याने त्यांनी गौरवच्या राहत्या घरी जाऊन खात्री केली. मात्र, फ्लॅटचा दरवाजा बंद दिसल्याने त्यांना संशय आला. त्यांनी सोसायटीतील नागरिकांच्या मदतीने फ्लॅटचा दरवाजा उघडला असता गौरव व नेहा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. दाम्पत्याने गळफास घेतल्याची माहिती इंदिरानगर पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी घरात बँकेचे विविध कागदपत्र व धनादेश, कर्ज मागणी अर्ज, बँकेच्या नोटीसा आढळून आल्या. जगताप दांम्पत्याने आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज इंदिरानगर पोलिसांनी वर्तविला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार किशोर देवरे करत आहेत.

सुसाईड नोट मध्ये अनेक धक्कादायक बाबी

दरम्यान, गौरव आणि नेहा यांनी मृत्यूपूर्वी सुसाईड नोट स्वतच्या हस्ताक्षरात लिहून ठेवली आहे. यात त्यांच्या आत्महत्या करण्याला कर्ज हेच कारण असल्याच समोर आल आहे. त्यात त्यांनी काही लोक त्यांना पैसे वसूलीसाठी त्रास देत असल्याचाही उल्लेख त्यात आढळतो. हे नेमके कोण आहेत, गौरव आणि नेहाच्या आत्महत्येला जबाबदार नेमके कोण याचा शोध पोलीस घेत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -