घरमहाराष्ट्रमतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी सायकलपटूंची 'दिल्ली' वारी

मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी सायकलपटूंची ‘दिल्ली’ वारी

Subscribe

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी लक्षात घेता या राजधानीत मात्र मतदानाची टक्केवारी घटल्याचे दिसून आले आहे. हे लक्षात घेऊन नाशिकच्या सायकलिस्टने मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी सायकलपटूंने एक नवा उपक्रम राबविला आहे.

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून मुंबईतील मतदानाची आकडेवारी बघता राष्ट्रीय सरासरीपेक्षा मुंबईची मतदान टक्केवारी कमी असल्याचे समोर आले आहे. ही टक्केवारी वाढवण्यासाठी नाशिकच्या सायकलिस्टने एक नवा उपक्रम राबविला आहे. ‘मतदान हा केवळ अधिकार नसून आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे’ या भावनेला उजाळा देत सहा सायकलपटूंनी आज दिल्ली वारीला सुरुवात केली आहे. मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी हुतात्मा चौकात या सहा साहसी वीरांना झेंडा दाखवून शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी नाशिक सायकलिस्टचे प्रमुख बैजल, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शिवडी विधानसभा मतदारसंघ बाळा वाघचौरेसह नाशिक सायकलिस्टचे सदस्य आदी उपस्थित होते.

मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी अभिनव उपक्रम

मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी हा अभिनव उपक्रम अभिनंदनीय आहे. मतदान वाढीसाठी युवावर्गाने पुढाकार घ्यावा. वेगवेगळे उपक्रम राबवावेत. तसेच मतदानाच्या दिवशी आणि आधी जरी सुट्टी असली तरी, मतदान करूनच सुट्टीचा आनंद घ्यावा.  – शिवाजी जोंधळे, जिल्हा निवडणूक अधिकारी

हे आहेत ते तरुण

रवींद्र दुसाने, चंद्रकांत नाईक, मोहन देसाई, राजेंद्र गुंजाळ, श्रीराम पवार आणि सुरेश डोंगरे हे सहा सायकलिस्ट मतदान करण्याचे नागरिकांना आवाहन करत दिल्लीपर्यंत सायकलने जात आहेत. मार्गात येणाऱ्या जनतेला ते मतदान करण्याची शपथ घालणार आहेत. शिवाय इतर सामाजिक संदेशांचे पण ते प्रबोधन करणार आहेत.

- Advertisement -

असा करणार प्रवास

येत्या ३ एप्रिल रोजी हुतात्मा चौक फोर्ट, मुंबई येथून सकाळी ७ वाजता यांची सायकल वारी निघाली असून गुजरात, राजस्थान मार्गे एकूण १ हजार ४४० किमी प्रवास (रीले फॉर्मेट ने) ७२ तासात पूर्ण करत ६ एप्रिलला सकाळी ७ वाजता अमर जवान ज्योत, इंडिया गेट आणि दिल्ली येथे हे सहा सायकलिस्ट गुढी उभारणार आहेत.


हेही वाचा – महाराष्ट्रातील आजच्या सभेत नरेंद्र मोदी कोणाला करणार ‘लक्ष्य’

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -