घरमहाराष्ट्रजितेंद्र आव्हाड आता राष्ट्रवादीचे 'राष्ट्रीय सरचिटणीस'

जितेंद्र आव्हाड आता राष्ट्रवादीचे ‘राष्ट्रीय सरचिटणीस’

Subscribe

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळी लक्षात घेऊन शरद पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे.

आक्रमकपणे विरोधकांवर टीका करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांना आता पक्षाने महत्वाची जबाबदारी दिली आहे. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे वेध आता सर्वच राजकीय पक्षांना लागले असून, त्यांच्याकडून निवडणुकीसाठीची मोर्चेबांधणीही सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही नियुक्ती केली आहे.

जितेंद्र आव्हाड हे पवारांचे विश्वासू

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळी लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आव्हाड यांच्याकडे पक्षातील मोक्याचे पद सोपवले आहे. जितेंद्र आव्हाड हे पवारांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. सोशल मीडिया असो किंवा इतर कोणतेही माध्यम असो आव्हाड नेहमीच पक्षाची बाजू आक्रमकपणे मांडत असतात. तसेच भाजप आणि शिवसेनेवर त्यांनी अनेकदा आक्रमक टीका देखील केल्या आहेत. दोनच दिवसांपूर्वी शरद पवारांवर टीका केली म्हणून त्यांनी भाजपचे नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार हल्ला चढवला होता.

- Advertisement -

वाचा – जितेंद्र आव्हाड भडकले; म्हणाले, ‘परत एकदा महाराष्ट्र पेटवणार

वाचा – प्रकाश आंबेडकरांचा इतिहास कच्चा; जितेंद्र आव्हाडांचा टोला

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -