घरमहाराष्ट्रDatta Dalvi Arrest : "कितीही गुन्हे दाखल झाले तरी..." दत्ता दळवी भूमिकेवर...

Datta Dalvi Arrest : “कितीही गुन्हे दाखल झाले तरी…” दत्ता दळवी भूमिकेवर ठाम

Subscribe

दत्ता दळवी यांना भांडुप पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले. त्यामुळे या प्रकरणी आता दळवी यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. परंतु, यामुळे आता ठाकरे गट आक्रमक झाला आहे. तर दळवी यांनी त्यांच्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगण्यात आले आहे.

मुंबई : ठाकरे गटाच्या अडचणी या दिवसेंदिवस वाढतानाच पाहायला मिळत आहे. कारण नाशिकमधील ठाकरे गटाचे नेते अद्वय हिरे यांच्या न्यायालयीन कोठडीत कालच मालेगाव कोर्टाकडून वाढ करण्यात आली आहे. त्यानंतर आज मुंबईचे माजी महापौर आणि शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते दत्ता दळवी यांना भांडुप पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. भरसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दत्ता दळवी यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ज्यामुळे आता राजकारणात एका नव्या वादाला सुरुवात झाली आहे. दत्ता दळवी यांना भांडुप पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले. त्यामुळे या प्रकरणी आता दळवी यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. परंतु, यामुळे आता ठाकरे गट आक्रमक झाला आहे. तर दळवी यांनी त्यांच्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगण्यात आले आहे. (Datta Dalvi explained his position in the case of insulting CM Eknath Shinde)

हेही वाचा – ठाकरे गटाच्या बड्या नेत्याला अटक; भरसभेत मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ करणं भोवलं

- Advertisement -

दत्ता दळवी यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, धर्मवीर चित्रपटामध्ये आनंद दिघे यांनी ज्या शब्दाचा वापर केला होता, त्याच शब्दाचा वापर मी केला. मालवणी भाषेमध्ये याच्यापेक्षा घाण शिव्या आहेत, त्या तर मी दिल्या नाहीत. पण, कितीही गुन्हे दाखल झाले तरी आम्हाला फरक पडत नाही. हे सुडाचे राजकारण आहे. असे म्हणत दळवी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तर महत्त्वाची बाब म्हणजे, मुंबई पोलिसांनी दत्ता दळवींची 2 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. अटकेपूर्वी दिली जाणारी 41(a) ची नोटीस स्वीकारण्यास दळवींनी नकार दिल्याचा दावा, यावेळी पोलिसांकडून कोर्टातून करण्यात आला आहे. मात्र या कलमाखाली कस्टडीची गरज नसल्याचं स्पष्ट करत दंडाधिकारी एम.आर. वाशिमकर यांनी पोलीसांची मागणी फेटाळली. त्यानंतर 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

नेमके प्रकरण काय?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे रविवारी (ता. 26 नोव्हेंबर) भांडुपमध्ये ईशान्य मुंबईत राहणाऱ्या कोकणवासियांचा जाहीर मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावापुढे राजस्थान प्रचारावेळी लावण्यात आलेल्या हिंदुह्रदयसम्राट या उपमेवरून माजी महापौर दत्ता दळवी यांनी शिवीगाळ केली. सार्वजनिक सभेत संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीबदद्ल अश्लील शिवीगाळ व अपमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे उपविभागप्रमुख भूषण पालांडे यांनी भांडूप पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यानुसार भांडुप पोलिसांनी माजी महापौर दत्ता दळवी यांच्या विरोधात भा.द.वी कलम 153 (अ), 153 (ब), 153 (अ), सी, 294, 504, 505 (1) (क) अंतर्गत गुन्हा दाखल केला. तर दत्ता दळवी यांनी जाहीर सभेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवीगाळ केली. यावरून शिंदे गटाचे नेते तसेच कार्यकर्ते आक्रमक झाले. ज्यानंतर त्यांनी संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीबद्दल अपमानकारक वक्तव्य केले, असा आरोप करत शिंदे गटाने पोलिसांत तक्रार दाखल केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -