घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशकात अवघे १५ टक्के ज्येष्ठ नागरिक घेतात लस

नाशकात अवघे १५ टक्के ज्येष्ठ नागरिक घेतात लस

Subscribe

७१ टक्के ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरणाकडे दुर्लक्ष

असोसिएशन ऑफ फिजिशिअन्स इंडिया (एपीआय) आणि इप्सोस यांच्यातर्फे नुकतेच नाशिकसह १५ शहरांमध्ये करण्यात आलेल्या सर्र्व्हेेक्षणानुसार ५० वर्षांहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये लस घेण्यास प्रमाण कमी असल्याचे समोर आले आहे. ५० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या ७१ टक्के ज्येष्ठा नागरिकांना प्रौढांसाठीच्या लसीकरणाबाबत माहिती असली तरी अवघे १६ टक्के ज्येष्ठांनी प्रौढांसाठी असलेली एखादी लस घेतल्याचे सर्व्हेक्षणातून उघडकीस आले आहे.

डॉक्टरांकडे वेळेची मर्यादा असल्यामुळे ते रुग्णांसोबत प्रौढांसाठीच्या लसीकरणाबाबत फारशी चर्चा करत नाहीत. खर्च आणि प्रतिबंधाहून अधिक प्राधान्य उपचारांना द्यावे लागत असल्यामुळे रुग्णही लसीकरणाच्या शिफारशी ऐकून घेण्यास फारसे उत्सुक नसतात, असे डॉक्टरांना वाटते. डॉक्टरांकडून ठामपणे शिफारस न केली गेल्यामुळे प्रौढांसाठीच्या लशी घेण्याच्या दृष्टीने सक्रियपणे काही केले जात नाही, असे रुग्णांचे म्हणणे आहे.

69 % ज्येष्ठ नागरिक प्रौढांसाठीच्या लसीकरणाबद्दल विचारत नाहीत. डॉक्टर शिफारस करतील असे त्यांना वाटते.

48 % कोरोना लसीकरणाप्रमाणे ज्येष्ठांच्या लसीकरणासाठी उपाय केले पाहिजेत, असे डॉक्टरांना वाटते.

50 % लसींचे डोस घेतल्यामुळे लसीकरणाची सवय लागेल, असे ज्येष्ठांना वाटते.

58 % आजारपण दूर ठेवण्यासाठी लसीकरण आवश्यक असल्याचे ज्येष्ठ नागरिक आणि डॉक्टरांना वाटते. 

47 %कोरोना सोडून इतर आजाराची लस घेवू नये, असे ज्येष्ठांना वाटते .

90 %औपचारिक मार्गदर्शक तत्त्वे नसल्यामुळे रुग्णांना लसीकरणाबाबत रस वाटत नाही व त्यांच्यात लस घेण्याचे प्रमाण कमी असते, असे डॉक्टरांनी सांगितले.

55 %कोरोना लसीकरण जागरुकतेप्रमाणे ज्येष्ठांच्या लसीकरणासाठी उपाय वापरावते, असे ज्येष्ठांना वाटते.

66 % मधुमेह, हायपरटेन्शनसारख्या आजारांमुळे शिंगल्स होण्याची शक्यता वाढल्याचे रुग्णांचे म्हणणे आहे.

73 % शिंगल्स आजार एकदा झाल्यानंतरही तो पुन्हा होऊ शकतो, याची माहिती रुग्णांना नाही.

देशभरात शिंगल्स आजाराबद्दल जागरूकतेचा अभाव

शिंगल्स (नागीण) हा ५० वर्षे व त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींना होणारा लसीद्वारे टाळण्याजोगा महत्त्वाचा आजार (व्हीपीडी) आहे. त्यामुळे त्याच्या प्रतिबंधाबाबतची जागरूकता कमी असल्याचे समोर आले. सर्वेक्षणाच्या दुसर्‍या भागात ५० वर्षे व त्याहून अधिक वयाच्या शिंगल्स रुग्णांना सहभागी करून घेण्यात आले. त्यांच्यातील जागरूकतेचा स्तर आणि रुग्णांवर या आजाराचा होणारा परिणाम समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. शिंगल्स किंवा हर्पीज झोस्टर हा आजार कांजण्यांना कारणीभूत विषाणू पुन्हा सक्रिय झाल्यामुळे होतो. हा विषाणू ५० वर्षे व त्याहून अधिक वयाच्या ९० टक्के प्रौढांच्या शरीरात असतो. हा आजार वेदनादायी असून, यात वेदना काही आठवडे किंवा काही महिने होत राहतात. शिंगल्स आजाराबद्दल देशात कमी जागरूकता आहे, असे सर्वेक्षणातून दिसून आले. शिंगल्सच्या रुग्णांना शिंगल्स आणि अन्य त्वचारोगांमधील फरक ओळखणे कठीण जाते आणि त्यामुळे निदानास विलंब होतो, उपचार तेवढे प्रभावी होऊ शकत नाहीत.

ज्येष्ठ नागरिक लसीकरणासाठी त्यांच्या डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यावर अवलंबून असतात. सध्या मार्गदर्शक सूचना नसल्यामुळे डॉक्टर्स नियमित सल्ल्याचा भाग म्हणून प्रौढ लसीकरणाची शिफारस करत नाहीत. लसीकरणाने टाळता येण्याजोगे आजार, आरोग्य आणि स्वास्थ्य उत्तम राखण्यामध्ये लसीकरण कसे उपयुक्त ठरू शकते याबद्दल ज्येष्ठ नागरिक आणि त्यांची काळजी घेणार्‍यांना शिक्षण देणे आवश्यक आहे.
– डॉ. मोहन पटेल,
असोसिएशन ऑफ फिजिशिअन्स ऑफ इंडिया

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -