घरमहाराष्ट्रनया है वह; अब्दुल सत्तारांच्या 'त्या' विधानावर फडणवीसांची कोपरखळी

नया है वह; अब्दुल सत्तारांच्या ‘त्या’ विधानावर फडणवीसांची कोपरखळी

Subscribe

अब्दुल सत्तारांना असं वाटतं, मला अतिशय आनंद आहे. नितीनजी आमचे मोठे नेते आहेत. पण अब्दुल सत्तार नया है वह, त्यांना शिवसेनेची काय माहिती आहे. त्यांना शिवसेनेची काहीच माहिती नाही, आता तर उद्धवजी आजारी आहेत. त्याच्या आधी पाच ते सहा महिन्यांत उद्धवजींना तरी ते भेटलेत काय हे मला माहीत नाही.

मुंबईः भाजप आणि शिवसेना यांच्यातील पूल केंद्रीय मंत्री नितीन गडकरीच जोडू शकतात, असे अब्दुल सत्तार म्हणाले होते. त्याच विधानावरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी सत्तारांना कोपरखळी लगावलीय. देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यावेळी त्यांनी अब्दुल सत्तारांच्या दोन्ही पक्ष एकत्र येण्याच्या मुद्द्यावर भाष्य केलंय.

अब्दुल सत्तारांना असं वाटतं, मला अतिशय आनंद आहे. नितीनजी आमचे मोठे नेते आहेत. पण अब्दुल सत्तार नया है वह, त्यांना शिवसेनेची काय माहिती आहे. त्यांना शिवसेनेची काहीच माहिती नाही, आता तर उद्धवजी आजारी आहेत. त्याच्या आधी पाच ते सहा महिन्यांत उद्धवजींना तरी ते भेटलेत काय हे मला माहीत नाही. त्यामुळे असं बोलायला महत्त्वाचं माणूस लागतं, असंही म्हणत देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्यावर हल्लाबोल केलाय.

- Advertisement -

नितीन गडकरी भाजप-शिवसेनेचा पूल जोडू शकतात

विशेष म्हणजे अब्दुल सत्तारांनी शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येऊ शकतील, असं विधान केलं होतं. 25 वर्षे एकत्र असलेली भाजप आणि शिवसेनेची युती 2019 साली मुख्यमंत्रिपदाच्या वादावरून तुटली. एकमेकांपासून फारकत घेतलेले दोन्ही पक्ष केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे एकत्र येऊ शकतात, असा दावा महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केला होता. भाजप आणि शिवसेना यांच्यातील पूल नितीन गडकरीच जोडू शकतात, असे अब्दुल सत्तार म्हणाले होते. अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड-सोयगाव मतदारसंघासह जिल्ह्यातील रस्ते विकासासंदर्भात दिल्ली येथे नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर त्यांनी हा दावा केला होता.

नितीन गडकरी हे राजकारणातील एक चालते-बोलते विद्यापीठ

नितीन गडकरींनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे युतीचा प्रस्ताव ठेवल्यास शिवसेना आणि भाजप एकत्र येतील. नितीन गडकरी हे राजकारणातील एक चालते-बोलते विद्यापीठ आहे. गडकरी हे राज्याचेच नव्हे तर देशाचे नेते आहेत. त्यांनी एकदा ठरवले पूल बनवण्याचे तर कुठेही कसाही पूल बनवणे, कशामुळे जोडणे, कशा प्रकारे जोडणे, हे त्यांना चांगले माहिती आहे. देशात त्यांचे मोठे नाव आहे. त्यांनी भाजप-शिवसेनेचा पूल जोडायचे मनावर घेतले आणि त्यांनी उद्धव ठाकरेंकडे युतीचा प्रस्ताव ठेवला तर महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप एकत्र येतील, असा दावा सत्तार यांनी केला होता.

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -