घरताज्या घडामोडी'अब्दुल सत्तारांना अजून शिवसेनेची हळद लागायची आहे', संजय राऊतांचे वक्तव्य

‘अब्दुल सत्तारांना अजून शिवसेनेची हळद लागायची आहे’, संजय राऊतांचे वक्तव्य

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महाविकास आघाडीचे प्रमुख नेते, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अजित पवार हे सगळेजण काम करत आहेत. त्यामुळे सरकार उत्तम चालणार आहे. भाजपने कितीही बार फोडले तरी राज्य सरकारचा काही वाकडं करु शकत नाहीत.

शिवसेना आमदार आणि मंत्री अब्दुल सत्तार यांना अजून शिवसेनेची हळद चढायची आहे असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये युतीचा पूल बांधण्याचे काम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी करु शकतात असे वक्तव्य अब्दुल सत्तार यांनी केलं आहे. सत्तार यांच्या या वक्तव्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच सत्तार यांच्या विधानाला अर्थ नाही असेही संजय राऊत म्हणाले आहेत. त्यांना अजून २५ वर्षे झाली नाही त्यांची हळद उतरली नसल्याचे राऊत म्हणाले आहेत.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. राऊत म्हणाले की, महाराष्ट्रातील एक राज्यमंत्री आहेत. सध्या ते शिवसेनेत आहेत. आमचे सहकारी आहेत ते शिवसेनेची भूमिका मांडत नाहीत. ते पक्षाची भूमिका मांडत नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची प्रकृती उत्तम आहे. त्यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जसा संवाद साधत आहेत तसेच मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. सध्या संवाद हा प्रत्यक्ष संवादापेक्षा व्हिसीद्वारे संवाद साधला आहे. शेवटी ती व्यक्ती जी आहे पदावरची ती सुचना देत आहे यालाच कारभार म्हणतात असे संजय राऊत म्हणाले आहेत.

- Advertisement -

मुख्यमंत्री कार्यकाळ पूर्ण करतील

प्रशासनाला सुचना दिल्या जात आहेत. राज्यावर लक्ष ठवले जात आहे. यामुळे कोण काय बोलत आहे आणि कोण सुचना देत आहे. याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज नाही. मुख्यमंत्री उत्तम काम करतील आणि कार्यकाळ पूर्ण करतील याबाबत शंका नाही. अधिवेशनात मुख्यमंत्री उपस्थित राहिले नाही हा गैरसमज आहे. पंतप्रधान कितीवेळ संसदेत उपस्थिती होते याची माहिती घ्यावी, दिल्लीत असून ते आले नाही. त्यामुळे प्रत्यक्ष उपस्थिती हा आता मुद्दा होऊ शकत नाही या कोरोना काळामध्ये असे राऊत म्हणाले आहेत.

अंगावरची हळद उतरायची आहे

हे जे मंत्री आहेत त्यांनी पक्षात २५ वर्षे पूर्ण केली तर मग त्यांच्या विधानाला अर्थ राहील. अजून त्यांच्या अंगावरची हळद उतरायची आहे. अजून त्यांच्या अंगाला शिवसेनेची हळद लागायची आहे. इतर शिवसेनेतील कोण बोलत नाही आहे. राज्य चालवणे आणि कॅबिनेट चालवणं हे टीमवर्क आहे. मुख्यमंत्री नसताना उपमुख्यमंत्र्यांचे काम राज्य चालवण्याचे आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बाणा हा नेतृत्व करण्याचा आहे. अजित पवार जे काम करत आहेत ते राज्याच्या हिताचे आहे. मुख्यमंत्र्यांच्या सुचनेनुसारच ते काम करत असतात असे संजय राऊत म्हणाले आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महाविकास आघाडीचे प्रमुख नेते, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अजित पवार हे सगळेजण काम करत आहेत. त्यामुळे सरकार उत्तम चालणार आहे. भाजपने कितीही बार फोडले तरी राज्य सरकारचा काही वाकडं करु शकत नाहीत. ते जे म्हणत आहेत की, लकवा मारला आहे. जर लकवा मारला काय आहे. हे पाहायचे असेल तर केंद्रातील सरकारकडे पाहावे त्यांच्या कामाची पद्धत काय आहे असे संजय राऊत म्हणाले आहेत.


हेही वाचा : …तर रश्मी ठाकरे मुख्यमंत्रिपद सांभाळू शकतात, शिवसेनेच्या मंत्र्याचं मोठं विधान

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -