घरमहाराष्ट्रउद्धव ठाकरेंनी साथ सोडणे हा सर्वात मोठा अपेक्षा भंग

उद्धव ठाकरेंनी साथ सोडणे हा सर्वात मोठा अपेक्षा भंग

Subscribe

देवेंद्र फडणवीस यांची टीका

महायुती म्हणून लढल्यानंतर शिवसेना बाहेर पडली. देशात असे कधीही घडलेले नव्हते. शिवसेना बाहेर पडेल, असे वाटले नव्हते. पण २०१९ मध्ये निवडणुकीचे निकाल लागले आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनी भाजपची साथ सोडली हा भाजपचा सर्वात मोठा अपेक्षाभंग होता, असे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले आहे.

फडणवीस म्हणाले की, आमच्या १०५ जागा आल्या. मात्र याला आम्ही पराभव म्हणणार नाही. जनादेश आमच्याजवळ होता. किंबहुना युतीला जनादेश मिळाला होता. मात्र आमच्या मित्रपक्षाने जनादेशाचा विश्वासघात केला त्यामुळे आम्हाला विरोधात बसावे लागले. जनतेने जनादेश आम्हाला दिला, मात्र शिवसेनेने फारकत घेतली आणि मोडतोड करुन सरकार स्थापन केलं. शिवसेना जे काही वागली त्याला काहीही अर्थ नव्हता.

- Advertisement -

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आम्ही ज्या जागा लढलो त्यातल्या १०५ जागा आम्हाला मिळाल्या. आम्हाला यापेक्षा जास्त जागा अपेक्षित होत्या. १६४ पैकी १३० जागा येतील अशी अपेक्षा होती, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

अजित पवारांना सोबत घेऊन शपथविधी हा आमचा गनिमी कावा होता. तो फसला. राष्ट्रवादीचे अजित पवार आमच्याकडे आले होते. आम्ही कोणत्याही नेत्याकडे गेलो नव्हतो. ते आले त्यांनी आम्हाला समर्थनाचे पत्र दिले, असेही फडणवीस म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -