घरमहाराष्ट्रशरजील उस्मानीला अटक करा नाहीतर आम्ही आंदोलन करू; फडवीसांचा ठाकरे सरकारला इशारा

शरजील उस्मानीला अटक करा नाहीतर आम्ही आंदोलन करू; फडवीसांचा ठाकरे सरकारला इशारा

Subscribe

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. 

मुस्लिम विद्यापीठातील माजी विद्यार्थी असलेल्या शरजील उस्मानीने पुण्यातील एल्गार परिषदेत हिंदू समाजाबद्दल केलेल्या अवमानजनक आणि आक्षेपार्ह वक्तव्यांची तातडीने दखल घेऊन त्यावर राज्य सरकारतर्फे तातडीने कारवाई करावी नाहीतर आम्ही आंदोलन करू, असा इशारा राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला माध्यमांशी बोलताना दिला. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. ‘३० जानेवारी २०२१ रोजी पुणे येथे आयोजित एल्गार परिषदेत अलिगड मुस्लिम विद्यापीठातील माजी विद्यार्थी असलेल्या शरजील उस्मानी याने अतिशय गंभीर, धार्मिक तेढ वाढविणारे, आक्षेपार्ह आणि समस्त हिंदू समाजाचा अपमान करणारी विधाने केली आहेत. आजचा हिंदू समाज पूर्णत: सडलेला आहे, हिंदू समाज हत्या करतो, घरी जाऊन आंघोळ करतो, दुसर्‍या दिवशी पुन्हा हत्या करतो, अशाप्रकारची ही गंभीर विधाने आहेत,’ असे फडणवीस त्यांच्या पत्रात लिहितात.

उस्मानी भाषणात काय म्हणाला

उस्मानी त्याच्या भाषणात नक्की काय म्हणाला, हेसुद्धा फडणवीस यांनी त्यांच्या पत्रात लिहिले. या भाषणातील शब्दश: वाक्ये अशी आहेत…’आज का हिन्दू समाज, हिंदुस्तान में हिंदू समाज बुरी तरीके से सड़ चुका है। ये जो लोग लिंचिंग करते हैं, कत्ल करते है, ये कत्ल करने के बाद अपने घर जाते है तो क्या करते होंगे अपने साथ? कोई नए तरीके से हात धोते होंगे, कुछ दवा मिलाकर नहाते होंगे। क्या करते है ये लोग की वापस आकर हमारे बीच खाना खाते है, उठते-बैठते है, फिल्में देखते है। अगले दिन फिर किसीको पकड़ते है फिर कत्ल करते और नॉर्मल लाईफ जीते है। अपने घर में मोहब्बत भी कर रहे है, अपने बाप का पैर भी छू रहे है, मंदिर में पूजा भी कर रहे है, फिर बाहर आकर यही करते है…’

- Advertisement -

कारवाई न होणे आश्चर्यजनक

तसेच फडणवीस त्यांच्या पत्रात पुढे म्हणतात, एक युवक राज्यात येतो, छातीठोकपणे हिंदुत्त्वावर शिंतोडे उडवितो आणि डोक्यावर मिरे वाटून निघून जातो आणि त्यावर काहीही कारवाई होत नाही, हा प्रकार अतिशय आश्चर्यजनक आहे. समस्त राज्याच्या चिंता वाढविणारा आहे आणि सर्वांच्या माना शरमेने खाली घालायला लावणारा आहे. मला आशा आहे की, हे पत्र मिळताच त्याच्यावर गुन्हा दाखल करून, शरजीलच्या मुसक्या आवळत महाराष्ट्रात आणून, अशा विधानांचे परिणाम काय असतात, यासंदर्भात कायदेशीर कारवाई करून त्याला अद्दल घडवाल.


हेही वाचा – भाजपचं ५ फेब्रुवारीला MSEBला टाळे ठोको आंदोलन

- Advertisement -

 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -