घरमुंबईडी. एस. हायस्कूलची ‘यशोगाथा’ राष्ट्रीय पातळीवर!

डी. एस. हायस्कूलची ‘यशोगाथा’ राष्ट्रीय पातळीवर!

Subscribe

राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्थेकडून शाळेच्या उपक्रमांची दखल. ‘जागतिक आव्हानांना तोंड देणारा सक्षम विद्यार्थी शिक्षणप्रक्रियेतून घडवण्याचा डी. एस. हायस्कूल सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे नमूद करत नवी दिल्ली येथील राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्थेच्या वेबसाइटवर डी. एस. हायस्कूलच्या यशोगाथेचा समावेश करण्यात आला आहे.

धारावी, सायन, प्रतिक्षानगर, कुर्ला परिसरातील कष्टकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची गंगा नेणार्‍या सायनमधील शिव शिक्षण संस्थेच्या डी. एस. हायस्कूलच्या नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. ‘जागतिक आव्हानांना तोंड देणारा सक्षम विद्यार्थी शिक्षणप्रक्रियेतून घडवण्याचा डी. एस. हायस्कूल सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे नमूद करत नवी दिल्ली येथील राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्थेच्या वेबसाइटवर डी. एस. हायस्कूलच्या यशोगाथेचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील फक्त पाच शाळांना हा गौरव प्राप्त झाला आहे.

आयसीएसई, सीबीएसई, आयबी यांसारख्या बोर्डांच्या भरमसाठ शैक्षणिक शुल्क आकारणार्‍या इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना ज्या गुणवत्तेच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात. त्या सर्व शैक्षणिक सुविधा मराठी माध्यमाच्या डी. एस. हायस्कूलमध्ये उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वतोपरी शारीरिक वाढीसाठी- क्रीडानिपुणता विकसित करण्यासाठी ‘लेट्स गेट फिट’, विज्ञानातील मूलभूत संकल्पना प्रात्यक्षिकांसह समजावून सांगणारा ’रोबोटिक्स’ अभ्यासक्रम, गायन-संगीताची आवड जोपासण्यासाठी ‘संगीत अकादमी’, सुसज्ज संगणक प्रयोगशाळा आणि डिजिटल लर्निंग आदी उपक्रम राबवले जातात. यामुळेच ‘यशोगाथा’ राष्ट्रीय स्तरावर गौरविण्यात आल्याची माहिती डी. एस. हायस्कूलचे अध्यक्ष राजेंद्र प्रधान यांनी दिली.

- Advertisement -

राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन संस्थेने ‘सक्षम नेतृत्व आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नावीन्यपूर्ण आणि अत्याधुनिक तंत्राचा अवलंब’ यांमध्ये उत्तम कामगिरी बजावणार्‍या महाराष्ट्रातील फक्त पाच शाळांमध्ये डी. एस. हायस्कूलची निवड करणे ही आमच्यासाठी निश्चितच गौरवास्पद बाब आहे. कोरोनाकाळात शाळा बंद असतानाही डिजिटल लर्निंगच्या माध्यमातून संगीत, क्रीडा, स्पोकन इंग्रजी, शैक्षणिक समुपदेशन आदी पाठ्यपुस्तकांच्या पलीकडचे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले, अशा शब्दांत प्रधान यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्थेकडून कौतूक

जागतिक आव्हानांना तोंड देणारा सक्षम विद्यार्थी शिक्षणप्रक्रियेतून घडवायचा आहे. अभ्यासक्रम पाठ्यपुस्तके कितीही उद्दीष्टानुवर्ती असली तरी प्रत्यक्षात शिक्षणप्रक्रियेत शाळेची भूमिका अत्यंत महत्वाची ठरते. या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी डी. एस. हायस्कूलसारखी शाळा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. शाळांच्या गुणवत्तेच्या प्रवासात महत्वाचा घटक म्हणजे शाळेतील सक्षम नेतृत्व. नाविन्याची कास स्वीकारणार्‍या मुख्याध्यापकांनी शालेय प्रशासन, स्वयंविकास, अध्ययन-अध्यापन सुधारणा, नवोपक्रम, भागीदारी, शालेय व्यवस्थापन या नेतृत्वाच्या सप्तसुत्रीतून आपल्या शाळेचे वेगळेपण, स्वत:ची एक नवीन ओळख निर्माण केली आहे, अशा शब्दात महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्थेने शाळेचे पत्राद्वारे कौतूक केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -