घरमहाराष्ट्रसोमय्या नॉट रिचेबल! केंद्राला विचारु तुमची सुरक्षा असलेले लोक कुठे आहेत? -...

सोमय्या नॉट रिचेबल! केंद्राला विचारु तुमची सुरक्षा असलेले लोक कुठे आहेत? – गृहमंत्री

Subscribe

आयएनएस विक्रांत निधी घोटाळा प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या हे नॉट रिचेबल आहेत. यानंतर अनेकांनी सोमय्या पिता-पुत्र फरार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी केंद्रीय गृहमंत्रालयावर बोट दाखवलं आहे. किरीट सोमय्या यांना केंद्राची झेड प्लस सुरक्षा आहे. त्यामुळे सोमय्या कुठे आहेत याची माहिती गृहमंत्रालयाकडे असते, असं क्लाईड क्रास्टो म्हणाले. दरम्यान, आता गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी यासंदर्भात भाष्य केलं आहे.

दिलीप वळसे पाटील यांनी मंगळवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळई त्यांनी सोमय्यांसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी आम्ही केंद्राला विचारु की तुमची सुरक्षा असलेले लोक कुठे आहेत? आरोप करणं सोपं असतं, आरोप करायेच मग स्वत:वर आरोप झाले की मग चौकशीला सामोरे जायचं नाही. हे काही फार शुरपणाचं लक्षण नाही, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले.

- Advertisement -

सोमय्यांचा ठावठिकाणा केंद्रीय गृहमंत्रालयाकडे – राष्ट्रवादी

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी किरीट सोमय्या यांना केंद्राची झेड प्लस सुरक्षा आहे. त्यामुळे सोमय्या कुठे आहेत याची माहिती गृहमंत्रालयाकडे असते, असं म्हटलं आहे. किरीट सोमय्या बेपत्ता असल्याची शहरात चर्चा आहे. पण झेड प्लस सुरक्षा असलेला माणूस बेपत्ता होऊ शकत नाही. कारण केंद्रीय गृहमंत्रालयाकडे त्याच्या ठावठिकाण्याची माहिती निश्चितपणे असेल. जर किरीटसोमय्या लपत असतील तर तपास यंत्रणांना आवश्यकता असेल तेव्हा माहिती देणे हे गृहमंत्रालयाचे कर्तव्य आहे,” असं क्रास्टो यांनी ट्विट करत म्हटलं आहे.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -