घरमहाराष्ट्रजखमी सापावर अशी केली जाते शस्त्रक्रिया

जखमी सापावर अशी केली जाते शस्त्रक्रिया

Subscribe

सध्या पावसाळा असल्यामुळे सापांच्या बिळात पाणी साचते. त्यामुळे सर्प बाहेर पडून लोकवस्तीकडे येत असतात. त्यात काही दुर्मीळ साप तर काही विषारी साप पाहायला मिळतात. मात्र भीतीपोटी सापांना मारले जाते. त्यामुळे अनेक दुर्मिळ सापांच्या जाती नष्ट होत चालल्या आहेत. कडूस येथे अतिशय दुर्मिळ जातीचा ‘पोवळा’ हा साप आढळला. येथील प्रगतिशील शेतकरी सोपानराव पानमंद यांच्या घराच्या अंगणात आढळलेला हा साप त्यांनी वनविभागाच्या ताब्यात दिला. तर दुसरीकडे पुणे जिल्ह्यातील घोडेगाव येथे एका जखमी झालेल्या विषारी सापाला सर्पमित्र आणि डॉक्टरांनी मिळून जीवनदान दिले आहे.

खेड तालुक्यातील कडूस येथील शेतकरी पानमंद यांना आढळलेल्या पोवळा हा दुर्मिळ जातीचा साप त्यांच्या घरासमोरील अंगणाच्या फरशीवर आढळुन आला. कधीही न दिसून येणारा हा साप अतिशय दुर्मिळ जातीचा असावा, अशी खात्री पानमंद यांची झाली. त्यानंतर त्या सापाला अलगद पकडून स्थानिक सर्पमित्राशी संपर्क साधला. सर्पमित्राच्या मदतीने त्यांनी हा साप राजगुरूनगर येथील वनविभागाच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिला. या सर्पाबाबत घोडेगाव येथील निसर्ग साहस संस्थेचे संचालक आणि सर्पमित्र धनंजय कोकणे यांनी हा पोवळा (Coral snake) जातीचा साप असल्याचे सांगितले.

- Advertisement -

जखमी सापावर यशस्वी शस्त्रक्रिया

पुणे जिल्ह्यातील घोडेगाव येथील परंडा वस्तीवर सापडलेल्या जखमी विषारी नागाला सर्पमित्र आणि पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या मदतीने जीवनदान मिळाले आहे. सापावर प्रथमोपचार आणि शस्त्रक्रिया केली गेली. परंडा वस्तीवर तुकाराम काळे यांच्या घराच्या ओढ्यावर हा विषारी नाग लोखंडी हुकाला अडकून जखमी झाला होता. सर्पमित्र धनंजय कोकणे यांनी जखमी सापाला पकडून निसर्ग सहास संस्थेच्या अनाथ प्राणी उपचार केंद्रात पशुवैद्यकीय डॉ. अभिषेक परदेशी यांच्या मदतीने आवश्यक ते उपचार दिले. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेऊन यशस्वी शस्त्रक्रिया केली. त्यानंतर सापाला वनविभाग त्याकडे सुपूर्त केले आहे

Doctor give treatment to injured sneak | Horrible Video

साप म्हटलं की चांगल्या चांगल्यांला घाम फुटतो. काही जण सापाला संपविण्याच्या तयारीत असतात. मात्र असेही काही आहेत, जे सपावर प्रेम करतात. घोडेगाव येथे एका जखमी सापावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. बघा अंगावर काटा आणणारा हा व्हिडिओ…

Posted by My Mahanagar on Sunday, 16 September 2018

- Advertisement -

कसा असतो पोवळा साप

या सापाला हिंदीत कालाधारी मूंगा म्हणतात. तर त्याचे शास्त्रीय नाव कॅलीओपीस मेलानुरुस (Calliopfis melanurus) आहे. अतिशय दुर्मिळ जातीचा असा हा साप आहे. हा जाडीने कमी असून फिक्कट तपकिरी रंगाचा, डोक्याच्या ठिकाणी आणि मानेला काळा रंग असलेला या सापाच्या शेपटीवर दोन काळ्या कडी असतात. पोवळा जमिनीखाली, गवत किंवा दगडांच्या खाली वास्तव्यात असतो. विषारी असूनही तो कधीच मानवी वस्तीत आढळत नाही. आकाराने लहान असल्याने मनुष्याला सहजासहजी दंश केल्याच्या घटना घडत नाहीत. या सापाचे विष निरोटॉक्ससिक असल्यामुळे चावल्यास सूज येणे, चावलेला भागात यातना होतात. वीस ते तीस मिनीटांनी श्वसन क्रियेत अडथळा येण्याची शक्यता असते. वन्य जीव संरक्षण कायदा अंतर्गत पोवळा साप वन्य जीवांच्या वर्गवारीत शेड्युल (२) मध्ये समाविष्ट आहे.

Coral snake - पोवळा जातीचा साप
Coral snake – पोवळा जातीचा साप

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -