घरमहाराष्ट्रप्रवाशांनो.. घाबरू नका, केवळ दक्षता घ्या..!

प्रवाशांनो.. घाबरू नका, केवळ दक्षता घ्या..!

Subscribe

मंत्री, अॅड. अनिल परब यांचे आवाहन

जगभर पसरलेल्या करोना विषाणूंच्या (व्हायरस )पार्श्वभूमीवर एसटीने देखील खबरदारीच्या उपायोजना केल्या असून, ” प्रवाशांनी घाबरून जाऊ नये परंतु योग्य ती दक्षता घेऊन प्रवास करावा.” असे आवाहन परिवहन मंत्री एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब यांनी केले आहे.
मंत्री परब यांनी एसटी प्रशासनाला निर्देश दिले आहेत, त्यानुसार राज्यातील प्रमुख शहरातील गर्दीच्या बसस्थानकावरील बैठक व्यवस्था दररोज दिवसातून दोन-तीन वेळा सॅनिटायझरचा योग्य वापर करून स्वच्छ केली जावी .तसेच बस स्थानकाचा परिसर जंतुनाशकांची फवारणी करून निर्जंतुक केला जावा . वाहकाकडे कर्तव्यावर निघत असताना ,सँनिटरी लिक्विड एक बाटली देण्यात यावी , प्रवाशांच्या गरजेनुसार त्यांनी ती उपलब्ध करावी. याबरोबरच आगारातून बाहेर पडणारी प्रत्येक बसे सॅनिटरी लिक्विड मिश्रित पाण्याने स्वच्छ धुऊनच मार्गस्थ केली जावी . तसेच बसस्थानकावरील उद्घघोषणा यंत्रणेद्वारे वेळोवेळी करोना विषाणूंच्या संदर्भात घ्यावयाच्या दक्षतेबाबत प्रवाशांना आवश्यक त्या सूचना देण्यात याव्यात.
अशा प्रकारे करोना विषाणूंचा (व्हायरस )फैलाव रोखण्यासाठी एसटी प्रशासन योग्य ती खबरदारी घेत असून, प्रवाशांनी घाबरून न जाता, योग्य ती दक्षता घेऊन प्रवास करावा असे आवाहन मंत्री महोदयांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -