घरताज्या घडामोडीडॉ. शीतल आमटे यांनी कुत्र्यांसाठी मागवलेले इंजेक्शन वापरून केली आत्महत्या ?

डॉ. शीतल आमटे यांनी कुत्र्यांसाठी मागवलेले इंजेक्शन वापरून केली आत्महत्या ?

Subscribe

इंजेक्शन नेमके कुठुन मागवण्यात आले होते, कशासाठी ती वापरली जातात , शीतल यांनी ती मागवली होती का याचा तपास करत असताना महत्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली.

महारोगी सेवा समितीच्या सीईओ आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शीतल आमटे यांनी कुत्र्यांसाठी मागवलेले इंजेक्शन टोचून आत्महत्या केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागपुरमधील फार्मासिस्टच्या चौकशीतून ही बाब समोर आली आहे.

डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी ३० नोव्हेंबरला आनंदवनात आत्महत्या केली होती. या घटनेने सगळीकडे खळबळ उडाली होती. शीतल यांच्या आत्महत्येचे नेमके कारण काय हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. मात्र शीतल यांच्या रुममध्ये दोन विषारी इंजेक्शन पोलिसांना सापडली होती. यामुळे ही इंजेक्शन नेमके कुठुन मागवण्यात आले होते, कशासाठी ती वापरली जातात , शीतल यांनी ती मागवली होती का याचा तपास करत असताना महत्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली.

- Advertisement -

डॉ. शीतल यांनी आत्महत्येपूर्वी नागपूरच्या फार्मासिस्टकडून कुत्र्यांसाठी वापरण्यात येणारी अॅनेस्थेशियाची पाच इंजेक्शन मागवली होती, अशी माहिती चौकशीत उघड झाली आहे. यातील एक इंजेक्शन शीतल यांच्या मृतदेहाजवळ तुटलेल्या अवस्थेत सापडले होते. यामुळे शीतल यांच्या आत्महत्येप्रकरणी तर्कवितर्क लढवले जात होते. पण आता ही इंजेक्शन सापडल्याने शीतल यांनी कुत्र्यांसाठी मागवलेले इंजेक्शन वापरून आत्महत्या केली असावी असा शक्यता व्यक्त केली जात आहे.


हेही वाचा – शिवाजी चुंभळेंच्या डंपरने महापालिका कर्मचार्‍याला उडवले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -